पश्चिम महाराष्ट्र

गोरे बेपत्ता प्रकरणी सांगलीतील माजी नगरसेवकही रडारवर

सकाळवृत्तसेवा

सांगली - वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांचे सांगलीत कुणाशी किती निकटचे संबंध होते, याचा शोध नवी मुंबई पोलिस घेत आहेत. कुरुंदकर आणि राजेश पाटील यांच्याशी संबंध असलेला एक माजी नगरसेवकही पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कुपवाडच्या व्यापाऱ्याबरोबर या दोघांचा कुरुंदकर कनेक्‍शनचा शोध पोलिस घेत आहेत. 

बेपत्ता झालेल्या सहायक निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस निरीक्षक कुरुंदकर यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या सांगलीतील कार्यकाळात निकटवर्तीय असलेल्यांची माहिती पोलिस घेत आहेत. कुणाशी त्यांचा किती जवळचा संबंध होता, त्यांचे लागेबांधे कोणत्या स्वरूपाचे होते, याची माहिती गोळा करण्यात येत आहे. कुरुंदकर सांगलीतून बदली होऊन बाहेरच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण होते, त्या सर्वांचे कुरुंदकरांशी असलेले संबंध तपासण्यात येत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

नवी मुंबई पोलिसांतर्फे अटकेत असलेले पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासण्यात येत आहे. यात त्यांनी कुणाशी किती वेळा संपर्क केला, कोणत्या काळात केला याची माहिती घेऊन संशयितांना ताब्यात घेण्यात येत आहे. असेच कॉल डिटेल्सवरून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाच्याला ताब्यात घेण्यात आले. 

कुरुंदकर सन २००८ मध्ये सांगलीत सहायक पोलिस निरीक्षक म्हणून हजर झाले होते. त्यांच्याकडे एमआयडीसी कुपवाड पोलिस ठाणे, त्या वेळी कुपवाडमध्ये त्यांचा संपर्क असायचा. यात एक व्यापारीही त्यांच्या संपर्कात आला होता. आता अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांच्या बेपत्ता प्रकरणात कुरुंदकर यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या कॉल डिटेल्सवरून माहिती मिळविण्यात येत असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. यात कुपवाडमधील व्यापाऱ्याबरोबरच एक माजी नगरसेवकही यांच्याशी कुरुंदकरांचा अश्‍विनी बिद्रे-गोरे यांच्या बेपत्ता होण्याच्या काळात अनेकदा संपर्क झाल्याचे समजते. त्यावरून या दोघांवर पोलिसांचा ‘वॉच’ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT