पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूरात सायकल डे फेरीला अभुतपूर्व प्रतिसाद

धर्मवीर पाटील

इस्लामपूर  -" सायकल चालवा निरोगी रहा ' असा संदेश देत आज इस्लामपूर शहरातील रस्ते सायकलनी फुलले. सकाळ व जायंट्‌स ग्रुप ऑफ इस्लामपूरच्या वतीने आयोजित सायकल डे फेरीला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला.

तरुणाईच्या ओसंडणाऱ्या उत्साहात प्रौढ व वृध्द नागरिकांनीही आपले वय विसरुन सायकल चालवली. दहा वर्षे वयापासून ते 80 वर्षे वयाचे नागरिक सहभागी होते. निसर्ग, पर्यावरण व आरोग्य याशी संबंधीत घोषणा देत शहराच्या वैभवात भर घालणारी सायकल रॅली आज अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली. सायकल रॅलीच्या माध्यमातून आरोग्य पर्यावरणाबरोबरच सामाजिक सलोख्याचेही आवाहन माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी आजच्या रॅलीत केले. 

सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक जनजागृतीचा अजेंडा हाती घेवून सकाळ माध्यम समुहाने राज्यभर विविध उपक्रम राबवले आहेत. जायंट्‌स ग्रुपच्या सहकार्याने आज इस्लामपुरात सायकल रॅली झाली. नागरिकांनी रस्तोरस्ती सायकलपटूंना प्रोत्साहन दिले. अनेक ठिकाणी स्वागत कमानी, डिजीटल फलक, फ्लॅग लावण्यात आले होते. गणाध्यक्ष ढोलताशा पथकाच्या दणदणाटाने आसमंत भारुन गेला. नव्या वर्षात सायकल चालवून आरोग्य सांभाळण्याचा संकल्पच जणू इस्लामपूरवासियांनी केला. शिराळा, सांगली, पलूस, कऱ्हाड येथून नागरिक व परिसरातील सायकलपटूंनी आवर्जुन उपस्थिती लावली. 

सकाळी आठ वाजता प्रशासकीय भवनाच्या आवारात जायंट्‌सच्या पीकअपशेड समोर उद्योजक सर्जेराव यादव, युवक राष्ट्रवादीचे खंडेराव जाधव, भाजपचे विक्रम पाटील, पोलिस उपाधिक्षक किशोर काळे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, राजारामबापू बॅंकेचे अध्यक्ष शामराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक, सम्राट महाडिक, जायंट्‌सचे अध्यक्ष संदीप राठी, फेडरेशन खजिनदार प्रशांत माळी, विशेष समिती सदस्य डॉ. नितीन पाटील, डॉ. सदानंद जोशी, डॉ. वंदना भोई यांच्या हस्ते रॅलीस प्रारंभ झाला. 

प्रांताधिकारी राजेंद्रसिंह जाधव, उपजिल्हाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. आर. आर. भोई, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, जायंट्‌सचे कार्यवाह दत्ता माने, खजिनदार प्रविण फल्ले, राजू ओसवाल, ईश्‍वरभाई पटेल, दुष्यंत राजमाने, अभिजीत निकम, किरीट पटेल, राष्ट्रीय सायकलपटू दत्ता पाटील, माधवनगरचे सायकलप्रेमी गोविंदकाका परांजपे, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, संजय बनसोडे, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे, सहारा फाऊंडेशनचे शाकीर तांबोळी, आरीफ तांबोळी, माजी नगरसेवक सदानंद पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे, नगरसेवक अमित ओसवाल, भारतीय मजदूर संघाचे गजानन पाटील, महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष सुजीत थोरात, जितेंद्र परदेशी, सोमनाथ फल्ले, क्रिडाई अध्यक्ष अमोल पाटील, सतीश पाटील, राजेंद्र माळी, ऍड्‌. फिरोज मगदूम, अनिकेत टिळे, बंडा रासकर, पिंटू ठाणेकर, सचिन कुंभार, रवी बावडेकर, मोहन जाधव प्रमुख उपस्थित होते. 

प्रशासकीय भवन आवारात सकाळी सात वाजल्यापासून तालुक्‍यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. सायकल चालवा, इंधन वाचवा, आरोग्य जपा, पर्यावरण संतुलन अशा आशयाचे शेकडो फलक विद्यार्थ्यांनी सायकलींवर लावले होते. कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, एनसीसी कॅडेट यांचा सहभाग लक्षणीय होता.

शाळा महाविद्यालये, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी प्रारंभीपासून स्वतः सायकल घेवून रॅलीत सहभागी झाले. झरी नाका, आझाद चौक, संभाजी चौक, लाल चौक, गांधी चौक, महावीर चौक, पोस्ट कार्यालय, व्यायाम शाळा, न्यायालय ते छत्रपती शिवाजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दरम्यान रॅली निघाली. जुन्या तहसील चौकात सांगता झाली. या ठिकाणी इंजिनीअर महेश माळी यांनी रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे वाटप केले. मॉडर्न कॉम्प्युटर्सतर्फे टोप्यांचे वाटप झाले. सहारा फाऊंडेशनने सुमारे तीन हजार स्टीकर वाटली.

कऱ्हाड येथील सायकल व्यावसायिक श्रीधर सुकरे यांनी वैभव सायकल मार्टतर्फे सायकल प्रदर्शन भरवले होते. जायंट्‌स ग्रुपच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. गणाध्यक्ष ढोल पथकाने सुमारे पाऊण तास आपल्या वाद्याच्या दणदणाटाने वातावरण भारावून टाकले. सुमारे 90 युवक, युवती वादक सहभागी झाले. सायकलपटू धर्मेंद्र पवार, दत्ता पाटील, 86 वर्षाचे गोविंदराव परांजपे, 76 वर्षीय प्रा. विजयकुमार जोखे, राष्ट्रीय विक्रमवीर मानसिंग देसाई, जगन्नाथ मोरे-पाटील, दिलीप कुंभार, बॉडीबिल्डर महाराष्ट्र श्री सुरेश सुतार, दत्ताजीराव पाटील यांचे विशेष सत्कार झाले. 

यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. यात सद्‌गुरु आश्रम शाळेचा विद्यार्थी शुभम पोतदार, यशवंतराव चव्हाण कॉलेजचा विद्यार्थी आशिष साळी, जावडेकर हायस्कुलचा साद तांबोळी व केबीपी कॉलेजचा अमन तांबोळी यांच्या चिठ्ठ्या निघाल्याने त्यांना सायकल देण्यात आली.

यावर्षी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ओसवाल ज्वेलर्स, सिध्दनाथ जीमचे नितीन फल्ले, वाय. पी. चव्हाण बंधू, सम्राट महाडिक यांच्या महाडिक युवा शक्तीतर्फे विठ्ठल साहेबराव कोळेकर (जनता हायस्कुल), प्राची सुरेश दोडके (महात्मा फुले विद्यालय), अर्जुन प्रमोद वाडकर (न्यु इंग्लीश स्कुल पेठ) यांना नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वितरण झाले.

सकाळ व जायंट्‌सचा उपक्रम कौतुकास्पद आहे.  सायकल रॅलीच्या निमीत्ताने सर्वांनी एकत्र येवून या पुढील काळात सामाजिक सलोखा अभियान सुरु करुया. घरोघरी जात पंथ धर्म विरहीत समाज निर्मीतीचे स्वप्न पूर्ण करुन सुख, शांती, समाधानाने राहण्याची प्रतिज्ञा करुया.

-  भगवानराव साळुंखे, माजी आमदार

संदीप राठी यांनी स्वागत केले. शांताराम पाटील यांनी प्रास्ताविक केले. धर्मवीर पाटील यांनी आभार मानले. विजय लोहार व राजू देसाई यांनी सुत्रसंचालन केले.

प्रविण फल्ले, रविंद्र सूर्यवंशी, डॉ. विजयकुमार वडेर, डॉ. राहुल मोरे, डॉ. अतुल मोरे, नितीन शहा, संपत कोकाटे, अभय शहा, अभिजीत निकम, सुनिल तवटे, अनिल माळी, ऍड्‌. विकास पाटील, अमेय शहा, सकाळचे बातमीदार तानाजी टकले, प्रकाश भालकर, प्रमोद माने, प्रसाद पाटील, संग्राम पाटील, अमोल पवार, अमृत शिंगण, संदीप पाटील, संतोष कागले, यिनचे अशुतोष वाकळे आदींनी संयोजन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT