पश्चिम महाराष्ट्र

सांगली पालिका निवडणूकः गणेशनगर केंद्रावर मतदान यंत्राबाबत संशय व्यक्त

सकाळवृत्तसेवा

सांगली - प्रभाग क्रमांक 15 मधील गणेशनगरातील मतदान केंद्रावर आज दुपारी दोनच्या सुमारास मतदान यंत्राबाबत संशयाने मोठा तणाव निर्माण झाला. या केंद्रातील मतदान यंत्रात दोष निर्माण झाल्याचा संशय बळावल्याने नागरिक या केंद्रात घुसले. त्यामुळे केंद्रातील कामकाज बंद पडले. निवडणूक अधिकारी तथा आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी केंद्रावर भेट देऊन नागरिकांच्या शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसही कुमकही मागवण्यात आली. सुमारे अर्धा तास केंद्र व परिसरात तणावाचे वातवरण होते.

खासदार संजय पाटील यांच्यासाठी हा प्रभाग प्रतिष्ठेचा असून त्यांच्या कुटुंबातील सदस्य भाजपचे रणजीत संभाजी पाटील-सावर्डेकर व युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्यात तुल्यबळ लढत आहे. आयुक्तांनी थेट केंद्राच्या परिसरात मोटार  नेल्याबद्दल शिवसेना उमेदवारांनी तक्रार केली. सर्वांना समान वागणूक द्या असा आग्रह त्यांनी धरला. 

दरम्यान आयुक्त खेबुडकर म्हणाले,"" मतदान यंत्राची सर्व खातरजमा केली असून त्यात कोणताही दोष आढळेला नाही. नव्याने मतदान केंद्र सुरु झाले असून केंद्रावर कडेकोट बंदोबस्त लावला आहे.''

सौम्य लाठीमार. 
प्रभाग पंधरामध्ये मतदान यंत्रात हातावर बटन दाबले की कमळाला जात असल्याची तक्रार कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यांनी मतदान केंद्रात धाव घेतली. यावेळी पोलिसांनी केंद्रात घुसलेल्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. आयुक्त व पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT