पश्चिम महाराष्ट्र

सोशल मिडीयाने विणले माणुसकीचे धागे 

संतोष भिसे

मिरज - शासकीय नोकरी करत असताना चाकोरीबाहेर जाऊन काम केले कि माणुसकीचे धागे कसे विणता येतात याचे सुंदर उदाहरण येथील शासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घालून दिले आहे. पन्नास वर्षे वयाचा अनोळखी पुरुष बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल झाला होता. डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार केले. ठाकठिक झाल्यावर सोशल मिडीयावरून त्याचा ठावठिकाणा शोधला. तब्बल दिड हजार किलोमीटरचा प्रवास करुन छत्तीसगडमधील नातेवाईकांनी त्याची गळाभेट घेतली. 

प्रमोद राम नावाचा हा गृहस्थ 12 मार्च रोजी जखमी अवस्थेत बेवारस म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल झाला. 108 रुग्णवाहीकेने मिरज - कोल्हापूर रस्त्यावरील अंकली परिसरातून त्याला रुग्णालयात आणले होते. काही दिवसांच्या उपचारांनंतर तो बरा झाला. पण त्याची मानसिक स्थिती ओळख सांगण्याजोगी नव्हती. त्यामुळे त्याला मानसोपचार कक्षात दाखल केले. समाजसेवा अधिक्षक डॉ. सूर्यप्रकाश राऊत आणि संतोष मुंगल यांनी त्याला विश्‍वासात घेतले. धीर दिला; तेव्हा त्याने त्रोटक माहिती दिली. मुळचा झारखंड येथील असून काही मित्रांसमवेत रोजगारासाठी महाराष्ट्रात आल्याचे त्याने सांगितले. कोल्हापुरात बांधकाम मजूर म्हणून तो काही दिवसांपासून काम करत होता. एके दिवशी शहरातून भटकला आणि अपघात होऊन अंकली परिसरात बेशुद्धावस्थेत पडला. 

ही माहीती मिळाली तरी त्याचे नेमके गाव स्पष्ट होत नव्हते. फक्त झारखंड राज्याचा रहिवासी इतक्‍या माहितीवर रुग्णालय प्रशासनाने सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा निर्णय घेतला. त्याचे छायाचित्र सोशल मिडीयाद्वारे व्हायरल केले. विशेषतः झारखंड राज्यातील काही ग्रुपवर फिरवले. याकामी तेथील डॉक्‍टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही मदत केली. त्याला यश मिळाले. झारखंडमधील डाली ( ता. छत्तरपूर, जि. पलामू ) येथे त्याचे घर व कुटुंबीय असल्याचे स्पष्ट झाले.

प्रमोदचा भाऊ रमेश राम याने मिरज शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधला. ओळख पटवून दिली. ते कुटुंबासह मिरजेत आले व प्रमोदला ताब्यात घेतले. कित्येक दिवसांपासून दुरावलेल्या भावाशी गळाभेट घेतली. याकामी निवासी वैद्यकीय अधिकारी मेघा भिंग्रा, अधिष्ठाता पल्लवी सापळे, उपअधिष्ठाता डॉ गायकवाड, वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रकाश धुमाळ, सुबोध उगाणे, डॉ दत्ता भोसले, समाजसेवा अधिक्षक भुषणी दीप आदींनी परिश्रम घेतले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election: महापालिका निवडणुकीत खेळीमेळी की खेळी? बिनविरोध विजयांमागचं सत्य आयोग शोधणार; अहवाल मागवला, आता चौकशी होणार!

Nawab Malik: मराठी-उत्तर भारतीय वादात नवाब मलिकांची एन्ट्री; महापौर पदावर राष्ट्रवादीचा हक्क सांगितला, भाजपवर टीका करत म्हणाले...

Arjun Tendulkar: अर्जुनचा पुन्हा फ्लॉप शो! गोवा संघाची हार, सूर्यवंशीच्या ८७ चेंडूंत नाबाद ११५ धावांनी गाजवला सामना

Pune News: कुंजीरवाडीच्या माजी सदस्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुटुंब थोडक्यात बचावले, प्रसंगावधान राखल अन् काय घडलं!

Latest Marathi News Live Update : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट्या जेरबंद

SCROLL FOR NEXT