पश्चिम महाराष्ट्र

कुंडल येथील व्यक्तीचा शिरशीत खून

सकाळवृत्तसेवा

शिराळा - शिरशी ते शिवरवाडी (ता. शिराळा) या दोन्ही गावच्या हद्दीवरच्या डोंगरावर असणाऱ्या चक्रभैरव मंदिराच्या गाभाऱ्यात खून झालेल्या अज्ञात व्यक्तीची चौथ्या दिवशी ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. कुंडल (ता. पलूस) येथील कृष्णात तुकाराम शिंदे (वय ४७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत संशयित म्हणून एका महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे हा खून आहे की नरबळी, याचा छडा लवकरच लागण्यास मदत होणार आहे. याचे खरे कारण आज स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. 

घटनेचा छडा लावण्यासाठी उपविभागीय पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. काल (सोमवारी) सकाळी सांगलीचे श्‍वानपथक घटनास्थळी आणले होते. त्याला मृत व्यक्तीच्या कपड्याचा वास दिल्यानंतर ते मंदिराच्या पश्‍चिमेला व पूर्वेला जवळपास तीस मीटरच्या अंतरावर मंदिराभोवतीच घुटमळले होते.

शिरशी ते शिवरवाडी या दोन्ही गावच्या हद्दीवरच्या डोंगरावर असणाऱ्या चक्रभैरव मंदिरात शनिवारी (ता. १८) पुरुष जातीच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह देवळाचे काम करण्यासाठी गेलेल्या कामगारांना दिसला होता. त्यांनी ही माहिती मालकाला दिली. मालकाने शिरशीच्या पोलिसपाटील यांना माहिती दिली. देवाच्या गाभाऱ्यात मृतदेह आढळून आल्याने तो नरबळी की खून, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तो नरबळी असावा, त्यामुळे त्या दृष्टीने तपास करावा, असे पोलिसांना निवेदन दिले आहे.

रविवारी कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तपासासाठी सहा पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली असून, नरबळी आहे की नरबळीच्या नावाखाली हा खून करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. याबाबत माहिती देणाऱ्याला २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. इतरत्रही तपास यंत्रणा गतिमान केली असताना आज ती व्यक्ती कुंडल (ता. पलूस) येथील असल्याचे निष्पन्न झाले. अजून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतात का, यासाठी तपास यंत्रणा गतिमान केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT