पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत शिवाजी विद्यापीठ उपपरिसरासाठी जागेची मागणी

सकाळवृत्तसेवा

सांगली - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा उपपरिसर (सब कॅम्पस) सांगली जिल्ह्यात मंजूर केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने विनामोबदला 100 एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांची भेट घेतली. भविष्यात उपपरिसराचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, अशा पद्धतीने रचना केली जाणार आहे, असे डॉ. शिंदे यांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्ह्यातील प्राचार्य उपस्थित होते.

महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठ उपपरिसर स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्‍यक जागा सर्व जिल्ह्याला रस्ते मार्गाने जोडणारी असावी आणि पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा, अशा अटी आहेत. ही जागा शासनाच्या मालकीची असावी आणि ती विद्यापीठाकडे विनामोबदला वर्ग करावी लागणार आहे.

- डाॅ. देवानंद शिंदे, कुलगुरु

शक्‍यतो गायरान जमिनींचाच विचार होईल, अशी शक्‍यता आहे. तासगाव किंवा कवठेमहांकाळ तालुक्‍यात राष्ट्रीय महामार्गालगत एवढ्या मोठ्या प्रमाणात गायरानच्या जागा उपलब्ध आहेत. तेथे प्राथमिक टप्प्यात पाहणीचे संकेत मिळत आहेत. 

उपपरिसर म्हणजे काय? 

  • विद्यापीठाप्रमाणेच सर्व सुविधा 

  • शिक्षण, संशोधन आणि प्रवेश प्रक्रिया 

  • विद्यार्थी, विद्यार्थीनी वसतीगृह होणार 

  • जिल्ह्यातील 70 हून अधिक कॉलेजना फायदा 

सोलापूरप्रमाणे स्वतंत्र विद्यापीठ 

शिवाजी विद्यापीठाचा उपपरिसर सोलापूर येथे सुरु करण्यात आला. कालांतराने उपपरिसराचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन झाले. सांगलीत भविष्यात उपपरिसराची रचना करताना स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसाठीचाच विचार केला जाईल, असे सांगण्यात आले. 

सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्याच जिल्ह्यात आवश्‍यक शैक्षणिक सोयी सुविधा मिळण्यासाठी उपपरिसर निर्मितीबाबत शिवाजी विद्यापीठाकडून प्रस्ताव येईल. तो शक्‍य तितक्‍या लवकर योग्य जागेची निवड करून राज्य शासनाकडे पाठवला जाईल.

- विजयकुमार काळम, 
जिल्हाधिकारी, सांगली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT