Sarasavale Sanglikar for help with Karamlai standards 
पश्चिम महाराष्ट्र

परतफेड : करमाळ्याच्या नावाडयासाठी धावले सांगलीकर

सकाळ वृत्तसेवा

   सांगली  : महापुराच्या काळात ते थेट करमाळ्याहून सांगलीकरांच्या मदतीसाठी बोटींसह धावून आला. त्यांच्या या मदतीची जाणीव ठेवत सांगलीकरांनीही त्यांच्या पत्नीच्या आजारपणासाठी सुमारे लाख रुपयांची मदत जमा करून दिली
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील शंकर माने महापुराच्या काळात सहकाऱ्यासह बोटी घेऊन सांगलीत मदतीला धावले.

आठवडाभर त्यांनी रात्रीचा दिवस करून मदत केली. अनेक पूरग्रस्त नागरिकांना बाहेर काढताना त्यांनी शर्थ केली. त्यानंतर ते गावी परतले. नित्य संसाराच्या व्यापात बुडाले. मात्र नियतीने त्यांची परीक्षाच घेतली. शेतात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नीला सर्पदंश झाला. किडणीवर विपरित परिणाम झाले. अकलुज येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 हेही वाचा- स्मार्टग्रामसाठी या गावाला मिऴाले चाऴीस लाख
 

आता आधाराची गरज

माने यांच्यावरील अरिष्टाची माहिती कळताच त्यांच्यासोबत महापूर काळात काम करणाऱ्या माजी नगरसेवक राजेश नाईक, सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुजावर यांनी पुढाकार घेत मदत गोळा केली. नाईक यांनी स्वतः धनअमृत पतसंस्थेच्या माध्यमातून मदत देऊ केली. मुजावर यांनी इन्साफ फाऊंडेशनतर्फे 35 हजार रुपये मदत गोळा करून दिली. त्यानंतर गेल्या चार दिवसांत अनेक नागरिकांनी आपल्या कुवतीप्रमाणे मदतीचा वाटा उचलत सुमारे लाखभर रुपये गोळा करून त्यांच्याकडे सोपवले

हेही वाचा -सांगली जिल्ह्यात पंचायत समितीत भाजपचा षटकार


 

मदतीसाठी संर्पक 
शंकर माने यांना थेट मदत करण्यासाठी बॅंक ऑफ इंडिया, टेंभुर्णी शाखा. आयएफएससी कोड : बीकेआयडी 0000741, खाते नंबर 074110510007119 या खात्यात जमा करावी, असे आवाहन श्री. मुजावर यांनी केले आहे



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाच्या आतूनच काही सूत्रं आम्हाला माहिती पुरवू लागले

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT