येरळा नदी sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Rain Update : ‘येरळा’पात्र ‘ताकारी’च्या पाण्याने तुडुंब

पावसाच्या पाण्याने नव्हे, तर ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने भरले

सकाळ वृत्तसेवा

आळसंद : बलवडी भा. (ता. खानापूर) येथील येरळा नदीच्या पाण्याचे पात्र तुडुंब भरले आहे. पावसाच्या पाण्याने नव्हे, तर ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने भरले आहे. या पाण्याने नदीकाठावरील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चार दिवसांपूर्वी ताकारी योजनेचे पाणी येरळा नदीत सोडले आहे. कमळापूर, तांदळगाव, वाझर, बलवडी येथील नदीकाठावरील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठ- दहा वर्षांपूर्वी ताकारी, आरफळ योजनेचे पाणी येरळा नदीपात्रात सोडले.

परिणामी, नदीपात्रात पाणी साचले.‌ नदीकाठच्या शेतकऱ्यांना दोन-तीन‌ किलोमीटरपर्यंत कोरडवाहू शेतीला जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला आहे. यावर्षी पाऊस लांबल्याने नदीपात्र कोरडे पडले होते.

नदीकाठावरील शेतातील पिके पाण्यावाचून करपून जाण्याची शक्यता होती. पाणी सोडल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

वाळू तस्करांना चाप

येरळा नदीपात्रातून वाळू उपसा होत होता. पलूस तहसीलदारांनी चार दिवसांपूर्वी बेकायदा वाळू उपसा करण्याऱ्यांवर कारवाई केली होती. वाळू उपसा करणाऱ्यांना ताकारी योजनेचे पाणी आल्याने चाप बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : नाशिकच्या सुरगाणामध्ये पुन्हा भुकंपाचे धक्के

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT