अपघातात
अपघातात sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : आयर्विन पुलावर अपघातात दोन ठार; १५ जखमी

सकाळ वृत्तसेवा

सांगली : येथील आयर्विन पुलावर मालवाहू छोटा टेम्पो आणि मोटार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले, तर १५ जण गंभीर जखमी झाले. इर्शाद नदाफ (वय ३३, कसबे डिग्रज) आणि सुभद्रा अर्जुन येळावीकर (वय ७८ रा. तुंग) असे मृतांचे नाव आहे. अपघातानंतर आयर्विन पुलावर गर्दी जमली होती. चार रुग्णवाहिकांमधून जखमी व मृतांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये सविता नवले (वय ४०), रुक्मिणी शिवाजी पवार (वय ६५), जनाबाई बाजीराव पाटील (वय ७०),मंगल सोपान कापसे (वय ५५), चालक सुनिल नामदेव गुरव (४०), यशोदा खबिले (वय ७०), अशोक शांतीनाथ मालगावे, फुलाबाई आप्पासाहेब खामकर (वय ४०, सर्व रा. तुंग), हैदर पटेल (व ३५), यांचा समावेश आहे.

पोलिसांकडून व घटनास्थळी मिळालेली माहिती, तुंग (ता. मिरज) येथील भजनी मंडळातील पुरूष व महिला आज रात्री शिरोळ येथे कार्यक्रमासाठी निघाले होते. सर्वजण मालवाहू छोटा टेम्पो (एमएच १० एके ५०३३) मध्ये होते. चालक सुनिल गुरव हा गाडी चालवत होता. टेम्पो रात्री पावणे दहाच्या सुमारास आयर्विन पुलावर टेम्पो आल्यानंतर सांगलीतून कसबे डिग्रजकडे निघालेल्या मोटारीने (एमएच १० बीएल २८८६) टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की टेम्पोचा चक्काचूर झाला. धडकेनंतर टेम्पो पुलावरील लोखंडी पाईपवर चढला. तीच स्थिती व्हॅगनची होती. धडकेनंतर दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. धडकेत व्हॅगनचा चालक इर्शाद नदाफ हा जागीच ठार झाला. तर मागे बसलेला हैदर पटेल हा जखमी झाला. तर टेम्पोत मागे बसलेली महिला जागीच ठार झाली. तर इतर सर्वजण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर टिळक चौक आणि सांगलीवाडीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाल्यामुळे आतील जखमींना कसरत करून बाहेर काढावे लागले. तोपर्यंत घटनास्थळी रूग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. चार रूग्णवाहिकांमधून जखमी व मृतांना सिव्हीलमध्ये आणले. काहीवेळातच अपघाताची माहिती मिळताच तुंग व कसबे डिग्रज येथील नातेवाईक व मित्रांनी सिव्हीलमध्ये धाव घेतली. त्यामुळे सिव्हील परिसरात गर्दी झाली होती. शहर पोलिसांनी अपघातानंतर तत्काळ पुलावर येऊन जखमींना बाहेर काढण्यात मदत केली. तसेच पंचनामा केला.

आयर्विनवरील सर्वात मोठा अपघात-

आयर्विन पुलावर अपघात होत असतात. परंतू आज रात्री झालेला अपघात हा सर्वात मोठा अपघात असल्याची चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT