sangli seema sachin lohar first st women driver msrtc Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : अंगात खाकी वर्दी अन् 'ती'च्या हाती एसटीचे स्टेरिंग!

पहिल्या कर्तव्यावर जाताना सांगली एस टी आगारप्रशासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला

शामराव गावडे

नवेखेड : अंगात इंनशर्ट केलेली खाकी वर्दी कमरेला पट्टा नजर समोर,समोरच्या वाहनांच्या गर्दीला कापत आणि खटाखट गिअर बदलत सुसाट धावणारी एस टी बस आणि चालवतय कोण तर' ती' काल सांगली एस टी आगारात सीमा सचिन लोहार या पहिल्या महिला एस टी चालक म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले.

त्यांच्यासह इतर सहाजणी चालक कम वाहक म्हणून हजर झाल्या आहेत १० ते १५ फुट लांब असणारी एस टी बस चालविणे मोठे कष्टाचे अवघड काम परन्तु याही क्षेत्रात महिलांनी आपले करिअर करण्यास सुरुवात केली आहे सुमारे दोन वर्षाचे प्रशिक्षण घेऊन या महिला सांगली आगारात दाखल झाल्या आहेत त्यांना सराईतपणे बस चालविताना पाहून पाहणारा आश्चर्यचकित होत आहे यातील बहुतांश महिला पदवीधर आहेत. काहींनी पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

पहिल्या कर्तव्यावर जाताना सांगली एस टी आगारप्रशासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळीसांगलीच्या पहिल्या महिला चालक सीमा सचिन लोहार आपले पहिले कर्तव्य सांगली कोल्हापूर पूर्ण केले सीमा लोहार,शारदा मदने,सुवर्णा बनसोडे स्वप्नांली सुवरे,कविता पवार,नसीमा तडवी ही महिलां चालक कम वाहकांची टीम सांगली विभागात दाखल झाली आहे.

एसटी म्हणजे अवजड वाहतुकीतील वाहन. तेथे पुरुष चालकांचीच मक्तेदारी. याला छेद दिलाय. विशेष म्हणजे पहिल्या फेरीसाठी त्यांना महिलाच वाहक दिलेल्या होत्या. त्यांचे प्रवाशांनी जल्लोषात स्वागत केले.

जिल्ह्यात एसटीची सेवा सुरू होऊन सत्तरहून अधिक वर्षांचा काळ लोटला. २००० पासून महिला वाहक एस टी सेवेत दाखल होत्या तब्बल तेवीस वर्षांनी एस टी च्या चालक पदी महिला आल्या आहेत.

सांगलीमध्ये स्वप्नाली शंकर सुवरे, सीमा सचिन लोहार, सुवर्णा अशोक बनसोडे, शारदा मदने, या चौघी सांगली आगारात रुजू झाल्या. तर. कविता मुकुंद पवार, नसीमा खलील तडवी या मिरज आगारामध्ये रुजू झाल्या. या सर्व महिला चालकांना वाहकाचेही प्रशिक्षण आहे. त्यामुळे यापुढे त्यांना चालक, वाहक या दोन्ही सेवा बजाव्या लागतील.

एसटीचे चालक होण्यासाठी या महिलांनी हायवे,नागमोडी वळणे, उतार, गर्दी घाट आदीं ठिकाणी एस टी च्या चालक प्रशिक्षण मोहिमेअंतर्गत काटेकोर प्रशिक्षण घेतले आहे. बस चालवण्याचे या महिलांनी जवळपास दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले.

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना रोज बस चालवावी लागत होती. त्यांची वैद्यकीय तपासणीही केली आहे. एसटीची वाहतूक सुरू झाल्यानंतर तब्बल ७५ वर्षानी महिला चालकांचे पथक सांगली महामंडळात रुजू झाले.सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असताना एस टी चालकपदी महिला आल्या आहेत ही खर तर अभिमानस्पद गोष्ट आहे.

जवळपास दोन वर्षाचे चालक प्रशिक्षण पूर्ण करून हजर झालेल्या या चालक महिला सांगली विभागाचा अभिमान आहेत लवकरच उर्वरीत महिला चालक हजर होतील

- सुनील भोकरे एसटी विभाग नियंत्रक, सांगली

आम्ही एस टी चे प्रदीर्घ प्रशिक्षण पूर्ण करून हजर झालोय सांगली विभागात आम्हला सहकारी चालक अधिकारी ,प्रवाशी यांचे चांगले सहकार्य मिळत आहे

- सीमा लोहार महिला चालक सांगली आगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT