Sangli Silk Farming Sangli Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीचा दशरथ झाला लखपती...

सकाळ वृत्तसेवा

 नरवाड (सांगली) : येथील दशरथ कुंभार यांनी एकरात तुती लागवडीतून रेशीम शेतीतून गेल्या वर्षी दीड लाखांचे उत्पन्न मिळवले. शेती पूरक व्यवसाय म्हणून त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कुंभार यांनी केलेली ही कामगिरी.कुंभार यांची 2 एकर शेती आहे. पारंपरिक उसासह ते अन्य पिके घेत असत.
 
रेशीम शेतीतून एकरात दीड लाखांचे उत्पन्न

महारेशीम अभियानामध्ये रेशीम उद्योग शेतीविषयी त्यांना माहिती मिळाली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवडीची रेशीम अधिकारी त्यांनी सर्व माहिती घेतली. एक एकरात व्ही-एक जातीची तुती लागली. कोषनिर्मितीसाठी सी.एस.आर या डबल हायब्रीड जात वापरून प्रथम बॅचसाठी त्यांना 1 बॅच मधून 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्या बॅचमध्ये 41 हजार 500 रुपये प्रथम वर्षी उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी 4 बॅचमधून 1 लाख 55 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यांच्या कुटुंबाला गावातच रोजगाराची संधी मिळाली. गावातच 206 रुपये प्रमाणे मजुरी मिळली.

रेशीमसाठी पोषक हवामान
रेशीम तुती लागवड करून त्यांच्या शेतीस पूरक धंदा करून वार्षिक दीड ते दोन लाखांपर्यंत 1 एकर क्षेत्रामधून उत्पन्न मिळत आहे. एकदा तुती लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्षे उत्पन्न मिळते. रेशीम उद्योग शेतीसाठी उत्कृष्ट जोडधंदा म्हणून हे शेती यशस्वी होऊ शकते असा दावा श्री. कुंभार यांनी केला. ते म्हणाले, ''इतर पिकाच्या तुलनेमध्ये कमी पाण्यामध्ये पीक काढता येते. शेतीवर मजुरांचा खर्च कमी लागतो, रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्याने फवारण्यांसाठी खर्च होत नाही. सवलतीच्या दराने अंडीपुंज पुरवठा केला जातो. राज्यातील हवामान रेशीमसाठी पोषक आहे. ही शेती आपल्याकडे यशस्वी होऊ शकते.'' 


  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT