Why Did This Village Become Dew
Why Did This Village Become Dew  
पश्चिम महाराष्ट्र

कशामुऴे हे गाव पडले ओस..

सकाळ वृत्तसेवा

सोन्याळ (सांगली)  : जतचा पूर्व भाग कायम दुष्काळी म्हणून गणला जातो. पाऊस कमी होतो . आठ -दहा वर्षांत या भागात पुरेसा पाऊस होण्याचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. या भागात दिवसेंदिवस परिस्थिती भयावह होत आहे. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पावसावरच अवलंबून रहावे लागते.

पाण्याचे इतर कोणतेही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे पावसावरच अवलंबून रहावे लागते. पावसाचे प्रमाण घटत चालल्याने स्थिती हाताबाहेर जात आहे. शेतकऱ्यांकडे जमिनीचे क्षेत्र भरपूर आहे. जमिनींकडे फक्त पाहतच बसावे लागण्याची नामुष्की ओढवली आहे. या कारणांमुळे शेतकऱ्यांपुढे उपजीविकेचा प्रश्न उभा नेहमीच उभा राहतो.

दरवर्षी ऊसतोड कामगारांच्या संख्येत वाढ

अनेक वर्षे या भागातील शेतकरी उपजीविकेसाठी ऊसतोडीचा एकमेव पर्याय निवडतात. त्यामुळे बरेच शेतकरी ऊसतोड कामगार म्हणूनच पोट भरत आहेत. पावसाच्या अनियमितेमुळे दरवर्षी ऊसतोड कामगारांच्या संख्येत वाढ होत आहे.

पदवीधर तरुणही ऊसतोडीच्या कामासाठी सज्ज

 पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले तरुणही ऊसतोडीच्या कामासाठी जात आहेत. सांगली, मिरज, कोल्हापूर, कुपवाड या भागात ऊस तोडीसाठी ते दरवर्षी जातात. पूर्व भागात ऊसतोड कामगारांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या भागावर ऊसतोड कामगारांचा भाग असा शिक्काच बसला आहे.

मुलांच्या शिक्षणाची आबाळ,वृद्ध घरीच

सहा-सहा महिने हे कामगार परगावी असतात. ऊसतोड करून उपजीविका होत असेल, पण कुटुंबीयांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ऊसतोडीच्या कामासाठी सहकुटुंब जावे लागत असल्याने मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते. फार मोठा प्रश्न उभा राहतो. वृद्ध घरीच रहात असल्यामुळे त्यांनाही अडचणी येतात. जी मुले ऊसतोडीसाठी आई-वडिलांसोबत जातात , त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. 

६० ते ७० टक्के लोक ऊसतोडीला

जत तालुक्‍याच्या पूर्व भागात ऊसतोड कामगारांचे प्रमाण जास्त असल्याने ऊसतोड कामगार गेल्यानंतर गावे ओस असतात. जवळपास ६० ते ७० टक्के लोक ऊसतोडीला जातात. त्याचा गावातील व्यवसायांवर मोठा परिणाम होतो. आर्थिक उलाढालही घटते. ऊसतोडीसाठी लोक गेले की सहा महिने माघारी येत नाहीत. त्यामुळे गावे ओसच असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT