sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

'महाडिक गट अन् विषय कट'; आगामी निवडणुकीत कोण मारणार बाजी?

9 नोव्हेंबरला होणार निर्णय; कोण मारणार बाजी? महाविकास आघाडी की भाजप

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत वाळवा तालुक्याचे महत्व यावेळीही अधोरेखित झाले आहे. पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. वाळवा तालुक्यातून राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, शिवसेना या पक्षांनी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यापैकी वाळवा तालुक्यातून कोणाला संधी मिळणार? याची उत्सुकता आहे. महाडिक गटाने भाजपामधून अर्ज दाखल केले असले तरी `महाडिक गट आणि विषय कट` अशी लढतीची भुमिका नेहमीप्रमाणे ठेवल्याने काही झाले तरी निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला आहे.

विद्यमान संचालकांचे राजकीय पक्ष पाहिले तर राष्ट्रवादीचे ९, काँग्रेसचे ५, शिवसेना १ व भाजपा ६ असे चित्र आहे. गतवर्षी सहकारी संस्थेत राजकारण नको म्हणून भाजपने राष्ट्रवादीसोबत बँकेच्या पायऱ्या चढल्या होत्या. यंदाही भाजपला बरोबर घेण्याची मानसिकता जयंत पाटील यांची होती. मात्र, राज्यातील फॉर्म्युलाप्रमाणे राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांचे पॅनेल करुन भाजपला बँकेत रोखण्यासाठी काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम आग्रही आहेत.

सध्या तालुक्यात राष्ट्रवादीचे दिलीपतात्या पाटील, बी. के. पाटील, विलासराव शिंदे हे निवडून आलेले संचालक आहेत. ॲड. चिमण डांगे तज्ञ संचालक आहेत. यंदा बी. के. पाटील यांनी अर्ज ठेवलेला नाही. तर दिलीपतात्या पाटील व विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे, कासेगावचे देवराज पाटील, वाटेगावचे रविंद्र बर्डे, कोरेगावचे व्यंकटराव पाटील, ॲड. चिमण डांगे व उदय पाटील यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केले आहेत. सातपैकी कोणाला संधी देणार याकडे लक्ष आहे. काँग्रेसकडून वैभव पवार, अलकादेवी पवार (इस्लामपूर), संदीप जाधव (येलूर), हिंदूराव वाटेगावकर (बोरगाव), नंदकुमार कुंभार (इस्लामपूर) यांनी अर्ज दाखल आहेत. विद्यमान संचालक मंडळात एकही काँग्रेसचा चेहरा नाही. त्यामुळे मंत्री कदम वाळवा तालुक्याला संधी देणार की थांबायला लावणार याची उत्सुकता आहे. शिवसेनेकडून अशोक माळी (पेठ), मधुकर पाटील (कापूसखेड) हे दोन अर्ज दाखल आहेत.

भाजपकडून राहुल महाडिक, मारुती खोत (बहादूरवाडी), भानूदास मोटे (तांदूळवाडी), सी. बी. पाटील, जयराज पाटील (कामेरी) यांनी अर्ज भरले आहेत. सी. बी. पाटील हे विद्यमान संचालक आहेत. महाडिक यांनी सोसायटी व पतसंस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही झाले तरी बँकेत जायचेच या तयारीने महाडिक यांनी जिल्हा दौरा केला आहे.

लढतीचे चित्र स्पष्ट नाही...

वाळवा तालुक्यातील लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. राहुल महाडिक सोडले तर एकही उमेदवार लढणारच असे ठामपणे सांगत नाही. त्यांची भूमिका त्यांच्या भुमिकेवर अवलंबून आहे. ९ नोव्हेंबरला लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT