ICC women s World Cup 2022 sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : महिला विश्‍वचषक’वर सट्टा घेणाऱ्यास अटक

भारत-पाक सामन्यावर केले बेटिंग

सकाळ वृत्तसेवा

सांगली: महिला क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तानमधील सामन्यावर ऊर्मिलानगर, लव्हली सर्कलजवळ येथे सट्टा घेणाऱ्या रोहित अनिल संकपाळ (वय २२, रोहिदासनगर, गावभाग) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण व संजयनगर पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला.

अधिक माहिती अशी, सध्या महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. त्यातील सामन्यांवर सट्टा घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिले होते. आज सकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना होता. हा सामना सुरू असताना ऊर्मिलानगर येथे सिंधू प्रभाकर सरोडे यांच्या घरात रोहित संकपाळ हा सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने महाराष्ट्र जुगार कायद्यातील कलमानुसार झडती वॉरंट तयार केले.

सरोडे यांच्या घरासमोर पोलिस पथकाने येऊन रोहितला हाक मारली. तेव्हा आतमध्ये महिला वर्ल्डकपचा सामना सुरू असून, रोहित हा मोबाईलवरून बोलत सट्टा घेत असल्याचे निदर्शनास आले. त्याला विचारणा केल्यानंतर महिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT