Sanglikar Sitaram Kunte is the new Chief Secretary of the state 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीकर सीताराम कुंटे राज्याचे नवे मुख्य सचिव 

जयसिंग कुंभार

सांगली ः मूळचे सांगलीकर सीताराम कुंटे यांची आज महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी निवड झाली. सहकारी प्रवीणसिंह परदेशी यांना मागे टाकत त्यांना मुख्य सचिव म्हणून संधी देताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रथम पसंती दिली आहे. 

सीताराम कुंटे मूळचे सांगलीकर. त्यांच्या आजोबांचा कुंटेवाडा सांगलीतील कापड पेठेत होता. सध्या तिथे महेश नागरी पतसंस्थेची इमारत आहे. कुंटे यांचे बालपण पाटणा (बिहार) शहरात गेले. उच्चशिक्षणासाठी कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यांचे वडील बिहार केडरचे आयएएस होते. नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून परिचित असणारे त्यांचे वडील बिहारचे प्रधान सचिव म्हणून निवृत्त झाले. पुढे निवृत्तीनंतर कुंटे यांनी अहमदाबादच्या "आयआयएम'मध्ये अतिथी व्याख्याते म्हणून काम केले. त्यांचे वडील निवृत्तीनंतर काही काळ सांगलीत स्थायिक झाले.

विश्रामबागला हॉटेल पै प्रकाशजवळ त्यांचे घर आहे. सीताराम कुंटे यांच्या आई गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील. कुंटे यांचे आजोळचे नाव देवधर. बीए अर्थशास्त्र, एमए अर्थशास्त्र पदवीनंतर 1985 मध्ये कुंटे आयएएस झाले. राज्य शासनात विविध पदांवर काम करताना त्यांना मसुरीच्या आयएएस ट्रेनिंग ऍकॅडमीतर्फे 2013 मध्ये "न्यू यॉर्क'ला विशेष प्रशिक्षणाची संधी मिळाली होती. देशातील मोजक्‍या आयएएस अधिकाऱ्यांना अशी संधी मिळते. 

मुंबई महापालिका आयुक्त तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळलेले कुंटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासातील अधिकारी मानले जातात. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदावरील कार्यकाळात त्यांचे सचिव म्हणून काम पाहिलेल्या प्रवीणसिंह परदेशी यांनी कोरोनाकाळात मुंबईची परिस्थिती योग्य रीतीने हाताळली नसल्याची चर्चा सुरू झाल्याने त्यांच्या जागी इक्‍बालसिंग चहल यांना महापालिका आयुक्त करण्यात आले.

या बदलानंतर दुखावलेले परदेशी राष्ट्रसंघात रवाना झाले होते. तथापि, आता ते परत आल्यावर कुंटे व त्यांच्यात मुख्य सचिवपदासाठी चुरस होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सीताराम कुंटे यांना पसंती दिली. ते नोव्हेंबर 2021 मध्ये निवृत्त होत आहेत. ते सध्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदावर कार्यरत होते. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार हे 28 फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी श्री. कुंटे पुढील नऊ महिने असतील.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT