पश्चिम महाराष्ट्र

शाहरुखखानांच्या संकल्पपुर्तीसाठी सांगलीचे योगदान

धर्मवीर पाटील

इस्लामपूर : अभिनेते शाहरुखखान यांनी कोरोना आपत्तीत डॉक्‍टरांच्या उपयोगी पडणारी पीपीई किट मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या संकल्पासाठी सांगली जिल्ह्यातील उद्योजकांनी योगदान दिले आहे हातभार लावला आहे. त्यांच्या मीरा फाउंडेशनने राज्य सरकारला देऊ केलेली 25 हजार किट्‌स सांगली जिल्ह्यात तयार झाली आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य किट्‌सच्या तुलनेत ती कमी दरात असून मीरा फौंडेशनने त्यास पसंती दिली आहे.

"कोरोना' विरुद्धच्या लढ्यात आरोग्य व्यावसायिकांचे सुरक्षा कवच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीपीई किटचे (पर्सनल प्रोटेक्‍शन किटस्‌) उत्पादन सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे व कोल्हापुरातील गांधीनगर, इचलकरंजी, अंबप व मौजे वडगाव येथे तयार होत आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तयार कपड्यांच्या कारखान्यातून रोज सुमारे 10 हजार किटचे उत्पादन होत आहे. संबंधित उद्योगांना या किटच्या पुरवठादाराने जेवढे पुरवाल तेवढे उद्दिष्ट अशी मुभा दिल्यामुळे लॉकडाऊन काळातही या उद्योगात लगबग आहे.
"कोरोना' विरुद्धच्या लढताना बाधित रुग्णांपासून होणाऱ्या संसर्गापासून आरोग्य सेवकांचा बचाव करण्यासाठी पर्सनल प्रोटेक्‍शन किट वापरण्यात येते. हे किट संबंधित व्यक्तीने चार तासांपेक्षा अधिक काळ वापरू नये, असा जागतिक आरोग्य संघटनेचा आदेश आहे. याविषयी केलेल्या एका अभ्यासात 100 खाटांच्या रुग्णालयासाठी दिवसाला किमान 400 किटची गरज आहे.
देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आणि संभाव्य आकडा लक्षात घेता देशाला लाखो किटस्‌ची गरज लागणार आहे. आजपर्यंत देशी उद्योजकांचा अल्प सहभाग असल्यामुळे भारताला परदेशातून आयात होणाऱ्या पीपीई किट्‌सवर अवलंबून राहवे लागत असे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर देशातील अनेक उद्योजकांनी त्यासाठई आता पुढाकार घेतला असून सांगलीस्थित पारस ट्रेडिंग कार्पोरेशन या कंपनीने राज्य सरकारच्या हाफकिन इन्स्टिट्यूटबरोबर पीपीई किटस्‌ पुरवठ्याचा करार केला. त्यांच्या मुंबई येथील युनिटमध्ये या करारातील किटसच्या संख्येच्या तुलनेत क्षमता कमी असल्याने त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गारमेंट उद्योगात कार्यरत असलेल्यांना आवाहन केले. त्यानुसार 15 दिवसांपासून या किट्‌सचे उत्पादन सुरू झाले आहे.
विहित कालावधीत 10 लाख पीपीई किटस्‌चे उत्पादन युद्धपातळीवर पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या सांगलीमधील दुधगाव, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, गांधीनगर, अंबप व मौजे वडगाव येथे काम सुरू आहे. कंपनीने संबंधितांना "कोरोना'चा संसर्ग होऊ नये याकरिता सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर्सचा वापर आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, याविषयीच्या अटी घातल्या आहेत. या उद्योजकांकडून दररोज 10 हजार पीपीई किटस्‌ तयार होत असल्याची माहिती संस्थेचे भागीदार कैलास आवटी (दुधगाव) यांनी दिली. सध्या संस्थेच्यावतीने तीन वेगवेगळ्या डिझाईन्सवर काम केले जात आहे. यात जिल्ह्यातील गारमेंट उद्योगांकडून ड्रेस, कॅप, हॅंडग्लोज व शू-कव्हर बनवून घेतले जात आहेत. राजस्थानातून गॉगल आयात करण्यात येत आहेत. मास्क पुरवठादाराकडून मास्क खरेदी करून त्याचे एकत्रित किट सरकारला पुरवण्यात येत आहेत.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT