पश्चिम महाराष्ट्र

त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या आवाजातील सीडीचे उद्या हस्तांतरण

रजनीश जोशी

त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या आवाजातील सीडीचे उद्या हस्तांतरण

सोलापूर : येथील रेकॉर्ड कलेक्‍टर्स सोसायटीचे जयंत राळेरासकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कै. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्त एका ध्वनिफितीची (सीडी) निर्मिती केली आहे. तीत सरदेशमुखांच्या मुलाखती, भाषणे, कविता-वाचन इत्यादीचे संकलन आहे. सरदेशमुखांचा आवाज कायम स्वरूपी जतन व्हावा म्हणून ही सीडी श्राव्य ऐवज म्हणून हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संगीत विभागाकडे सोपवण्यात येणार आहे. उद्या, गुरूवारी (ता. 12) सकाळी 11 वाजता हि.ने.वाचनालयात प्रा. सरदेशमुख यांच्या स्मृतीदिनी हा कार्यक्रम होत आहे, अशी माहिती जयंत राळेरासकर यांनी दिली.यावेळी वाचनालयाचे ज्येष्ठ समीक्षक प्रा. निशिकांत ठकार, प्रा. सुलभा पिशवीकर, प्रा. पुष्पा आगरकर, श्री. दत्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असेल.

या सीडीबाबत माहिती देताना ते म्हणाले,""मागील वर्षी सरदेशमुख सरांच्या घरी 22 नोव्हेंबर रोजी जन्म-शताब्दीची सुरुवात झाली. त्यावेळी सरांचा आवाज आपण ऐकवला होता. महाकवी द.रा. बेंद्रे यांच्या कवितेचा सरदेशमुख सरांनीच केलेला अनुवाद आपण त्यांच्याच आवाजात ऐकला. तेव्हापासून सरांच्या आवाज आणखी कुठे असेल त्याचा शोध घेतला. पाकणी रेल्वे फलाटावर एका अनौपचारिक गप्पांमध्ये सरांनी सांगितलेली "तिन्ही सांजेची गोष्ट', आवर्जून ध्वनिमुद्रित केलेली एखादी मैत्रसंध्या (कविता वाचन), आकाशवाणी सोलापूरसाठी प्रा. ठकार यांनी घेतलेली त्यांची मुलाखत असे काही आठवले. मग ध्वनिफिती जमल्या. आकाशवाणीचे अधिकारी सुनील शिनखेडे यांनी काही उपलब्ध करून दिल्या. तांत्रिक अडचणी अनेक आल्या, आणि किंचित उशीर होत गेला. मात्र अखेर काही निवडक प्रसंग निवडून एक सीडी प्राथमिक स्वरूपात तयार झाली. ती उद्या, गुरूवारी छोटेखानी कार्यक्रमात, हिराचंद नेमचंद वाचनालयात, संगीत संग्रहालयात दिली जात आहे. याखेरीज आणखीही श्राव्य ऐवज आहे. तो यथाशीघ्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.''
 


सीडीमध्ये असलेला श्राव्य ऐवज
या ऑडियो सीडीमध्ये प्रा. ठकार व हेमकिरण यांनी आकाशवाणीसाठी घेतलेल्या स्वतंत्र मुलाखती, .रा. बेंद्रे यांच्या "कल्लादिगे ने नु' या कवितेचा अनुवाद, हरमान हेसे या तत्ववेत्त्या कवीच्या कविता, देवप्रियाची गाणी असा श्राव्य-ऐवज आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani house firing अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गँगस्टरने घेतली हल्ल्याची जबाबदारी!

Phulambri Accident : कार-दुचाकीचा अपघात मुलाच्या डोळ्यासमोर बापाने सोडला जीव..! मुलगा थोडक्यात बचावला

Latest Marathi News Updates Live : एसटीच्या ७५ बसस्थानकावर मोफत वाचनालय

PAK vs OMN : पाकिस्तानच्या दुबळ्या ओमानविरुद्ध रडले, फलंदाजांनी माना टाकल्या; भारताविरुद्ध निघणार यांची हवा...

Chhagan Bhujbal: ''मराठ्यांना EWS अन् SEBC आरक्षण नकोय का? उत्तर द्या'' छगन भुजबळांचा समाजाला प्रश्न

SCROLL FOR NEXT