Sarpanch shot dead 
पश्चिम महाराष्ट्र

सरपंचाचा गोळी झाडून खून

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी (नगर) ः राजकीय वादातून दैत्यनांदूरचे सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे (वय 52) यांचा पिस्तुलातून गोळी झाडून खून करण्यात आला. या घटनेत अन्य चौघे गंभीर जखमी झाले आहेत. दैत्यनांदूर गावातील बसथांब्याजवळ आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. राजकीय वादातून दोन गटांत धुमश्‍चक्री झाल्याचेही समजते. 

सरपंच दहिफळे व गावातील निवृत्त जवानाचे राजकीय मतभेद होते. त्यांच्यात नेहमी शाब्दिक खटके उडत. आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बसथांबा चौकात दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांवर काठ्या-कुऱ्हाडींनी वार केले. त्यामध्ये दोन्ही गटांचे काही कार्यकर्ते जखमी झाले. 

दहिफळे यांच्याविरोधी गटातील एकाने पिस्तुलातून गोळी झाडली. ती सरपंच दहिफळे यांच्या छातीत घुसली. त्यांना तातडीने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना नगरच्या दवाखान्यात पाठविण्यात आले. मात्र तेथील डॉक्‍टरांनी दहिफळे यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

सदाशिव अर्जुन दहिफळे (वय 50), ज्ञानेश्वर अशोक दहिफळे (वय 30), भीमराज जिजाबा दहिफळे (वय 60), अशी अन्य जखमींची नावे आहेत. त्यांच्यावरही पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदाशिव दहिफळे यांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांनाही नगरला हलविण्यात आले. 

संजय दहिफळे यांच्याविरोधी गटातील शहादेव पंढरीनाथ दहिफळे, विष्णू दहिफळे आणि द्वारकाबाई नागरगोजे हेही जखमी असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजकीय वादासोबतच भाऊबंदकीचा वादही याला कारणीभूत असल्याचे समजते. पोलिसात याबाबत कोणतीही तक्रार दाखल नाही.  


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यातल्या वानवडीत पुलावरून कार नाल्यात कोसळली; लष्करी अधिकाऱ्याने दाखवलं धाडस

Pune Crime News : वाघोली परिसरात अवैध हातभट्टी उद्ध्वस्त; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update: अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी

Pune News : तंत्रज्ञानातील बदलांसह नवीन कौशल्ये आत्मसात करा : डॉ. आनंद देशपांडे

Rajpal Yadav Surrender : राजपाल यादवचं तिहार तुरुंगात आत्मसमर्पण! ; ‘चेक बाउन्स’ प्रकरणी न्यायालयाने दिला होता अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT