पश्चिम महाराष्ट्र

लाॅकडाऊनमध्ये मिरची झाली तिखट; खिशाला फोडणी

सकाळ वृत्तसेवा

पिंपोडे बुद्रुक (जि.सातारा) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मिरचीचे भाव दुपटीने कडाडले असून, सर्वसामान्यांच्या खिशाला फोडणी बसली आहे. गृहिणी वर्षभर पुरेल इतकी चटणी उन्हाळ्यात करून ठेवतात. रस्सा झणझणीत झाल्याशिवाय जेवणाला मजा येत नाही. त्यामुळे लाल मिरचीला मोठी मागणी असते. गेल्या वर्षी या कालावधीत मिरचीचे भाव 120 रुपये किलो होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्यामुळे यंदा मिरचीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लाल मिरचीचे उत्पादन होते. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला असून, आवक कमी झाल्याने भविष्यात मिरची आणखी "तिखट' होण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी राज्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबरोबरच मिरचीचे उत्पादन घटले आहे. 

बेडगी मिरचीची किंमत प्रतिकिलो 320 रुपयांपर्यंत पोचली आहे. त्या खालोखाल तेजा मिरचीचा दर 220 रुपये प्रतिकिलो झाला आहे. मसाला उत्पादकांकडेही माल शिल्लक नसल्यामुळे मसाल्यांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. महागाईमुळे आहारात मिरचीचा तडका कमी झाला असून, स्वयंपाकात चटणीचा वापर जपून करण्याची पाळी गृहिणींवर आली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने बाजारपेठेत लाल मिरचीची आवक घटली असून, आठवडाभरात भाव आणखी वाढतील, असे येथील किराणा व्यावसायिक संजय महाजन यांनी सांगितले. त्यामुळे स्वयंपाकात बेताने तिखट वापरण्याची कसरत महिलांना करावी लागत आहे. आहारातील रूचकरता वाढावी, यासाठी झणझणीत रस्सा केला जातो; परंतु मिरचीचे वाढते भाव थेट आहारावर परिणाम करीत असून, आहारातील तडक्‍यास फटका बसला आहे.


मिरचीशिवाय चटणी होत नाही आणि चटणीशिवाय स्वयंपाक कसा करणार? कोरोनाचे कारण पुढे करून मोठे व्यापारी मालाची साठेबाजी करत आहेत. सरकारचा कोणावरच अंकुश नसल्याने सर्वसामान्यांना झळ सोसावी लागत आहे.
- राजश्री कदम, गृहिणी, देऊर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT