Satara Collector 
पश्चिम महाराष्ट्र

सातारा, कऱ्हाडात निर्बंधावर जिल्हाधिकारी ठाम, ग्रामीण भागाला दिलासा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात कंटेनमेंट (प्रतिबंधित) झोन वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात परवानगी काढून सर्व उद्योग सुरू करण्यास आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. ग्रामीण भागातील सर्व दुकाने व खासगी कार्यालये सुरू करण्यासही मुभा देण्यात आली आहे.

सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीत ही दुकाने सुरू राहतील. शहरी भागामध्ये कंटेनमेंट क्षेत्र वगळून केवळ अत्यावश्‍यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शहरी भागात निर्बंध असले, तरी आता ग्रामीण भागाला दिलासा मिळाला आहे. 

केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या काही सवलती आज जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातही लागू केल्या. त्यानुसार ग्रामीण भागातील सर्व उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. शहरी भागामध्ये नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी पूर्वीप्रमाणेच उद्योगांना बंधणे ठेवण्यात आली आहेत. ग्रामीण भागामध्ये परवानगी असलेल्या कामांसाठीच नागरिकांना फिरण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामध्ये दुचाकीवरून केवळ एकाला, तर चारचाकी वाहनातून चालकाव्यतिरिक्त दोघांनाच प्रवास करता येईल.

औद्योगिक कंपन्यांना शहरात, तसेच ग्रामीण भागातून वाहतूक बंद करण्यात आलेला आदेशही मागे घेण्यात आला आहे; परंतु सुरू करण्याची परवानगी दिलेल्या कंपन्यांना सायंकाळी सातनंतर कंपनीच्या बसनेच कामगार व अधिकाऱ्यांची ने-आण करावी लागणार आहे. सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत कोणालाही कोणत्याही वैयक्तिक वाहनाने वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर परजिल्ह्यातून कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना प्रवास व कामासाठी परवानगी दिली जाणार नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व इतर भागातील खासगी कार्यालयांना 33 टक्के कर्मचाऱ्यांवर कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 100 टक्के अधिकारी व 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालयेही सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

वैद्यकीय सेवा व अत्यावश्‍यक कारणाशिवाय जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधी घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी शेतीच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. दारू दुकाने व बिअर बारबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. 

दुकाने उघडण्यास वेळेची मर्यादा 

शहरी भागातील बाजारपेठा, माल्स, मार्केट बंदच राहणार आहेत. या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र वगळता केवळ अत्यावश्‍यक सेवेची दुकानेच सुरू राहतील. ग्रामीण भागात सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शारीरिक अंतर राखून सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीत ही दुकाने सुरू ठेवायची आहेत. 

हे बंदच राहणार... 

- शहरी भागातील बाजारपेठा, माल्स, मार्केट 

- सार्वजनिक बस वाहतूक 

- शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्‍लासेस 

- परमीट रुम, बिअर बार, सभागृह 

- सिनेमा हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, व्यायाम शाळा 

- क्रीडा संकुल, जलतरण तलाव, उद्याने, 

- टॅक्‍सी व कॅब सेवा, पानटपरी 

- सलून व स्पा दुकाने 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कॉकरोच जनता पार्टी'ची पाकिस्तानात क्रेझ! पाकमध्येही 'कॉकरोच पार्टी', देशाच्या गृहमंत्र्यानेच सरकारला दिला 'हा' इशारा

Deglur Accident: देगलूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

SCROLL FOR NEXT