पश्चिम महाराष्ट्र

लपून छूपून मुंबईहून आलेला युवकाही ठरला कोरोना बाधित; 51 अहवाल निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

सातारा : खावली येथील संस्थात्मक विलगीकरण केलेल्या 18 वर्षीय युवक आणि कराड येथील कोरोना बाधिताचा 59 वर्षीय  निकट सहवासित पुरुषाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

18 वर्षीय युवक हा 27 एप्रिल रोजी विनापरवाना मुंबईहून आला होता. त्याच्यावर जागेवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आणि तिथूनच सातारा तालुक्यातील खावली येथे संस्थात्मक विलगीकरणामध्ये त्याला ठेवण्यात आले होते. त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. हा मुलगा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल पुणे येथून प्राप्त झाला आहे. तर कराड येथील 59 वर्षीय पुरुष हा कोरोना बाधित व्यक्तीचा निकट सहवासित असल्याची माहिती गुरुवारी रात्री उशिरा देण्यात आली. 

दरम्यान आज (शुक्रवार) क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 38 व  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 13 असे एकूण 51 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 114 झाली असून इतकी आहे. या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 98, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 14, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण  आहेत.

धक्कादायक दूध विक्रेत्या कोरोनाबाधीतेस चक्क शहरातून चालवत नेले

कामगिरी फत्ते : घरापर्यंत काेट्यावधी रुपये पाेचले 

बिअर दाेन हजारांची फाेडणी आठ लाखांची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prateek Yadav PM Report : मुलायसिंग यांचा मुलगा प्रतिक यादववर विषप्रयोगाचा संशय? पोस्ट मार्टम रिपोर्ट आला; फुफ्फुसांचे काम अचानक बंद

RPI Leader Killed : पुणे हादरलं! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या; पिंपरी-चिंचवडमध्ये तणावाचं वातावरण, मोशीतील 'त्या' हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पुण्यात सुखसागरनगरमधील जुन्या गोदामाला लागली आग!

Chhatrapati Sambhajinagar: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश; हाती आले २ हजार, खर्च मात्र २९००; संतप्त होऊन भरउन्हात रस्त्यावर फेकले कांदे

Stock Market Today: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी! मात्र या IT शेअर्सला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT