पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : सातारा 'सिव्हिल' ला डाॅक्टरांच्या सुरक्षिततेत वाढ

सकाळ वृत्तसेवा

सतारा : एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न करण्यासाठी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेणे आवश्‍यक असते. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दोन अद्ययावत कोविड-19 टेस्ट क्‍युबिकल युनिट अर्थात स्वॅब टेस्टिंग युनिट उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे नमुने घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग विविध पातळ्यांवर लढत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम जिल्हा, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोनासदृश लक्षणे असलेल्यांची तपासणी करणे, आवश्‍यकता भासल्यास त्याच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेणे व रुग्ण पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी पार पाडत आहे. दुसरीकडे जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची यंत्रणा रुग्ण पॉझिटिव्ह आलेल्या परिसरातील सर्व्हे, बाहेरून आलेल्यांवर लक्ष ठेवण्याचे काम करत आहेत. सर्वांचेच काम अधिक जिकिरीचे व जिवाचा धोका पत्करण्याचे आहे.
 
त्यातही रुग्णाच्या अत्यंत जवळ जावून त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेणे, हे सर्वाधिक धोकादायक काम आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुरक्षिततेचे किट वापरूनच रुग्णाजवळ जावे लागते. तशा प्रकारची किटही जिल्हा रुग्णालयात व उपचाराची सुविधा असलेल्या अन्य उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये तसेच कृष्णा रुग्णालयात उपलब्ध आहेत. विशेषत: जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने संशयितांचे नमुने घेण्याचे काम होत असते. अशा प्रकारे पीपीई किट वापरून घशातील स्त्रावाचे नमुने घेण्याच्या पद्धतीपेक्षाही सुरक्षित अशी पद्धत विकसित झाली आहे. परंतु, जिल्हा रुग्णालयामध्ये ती उपलब्ध नव्हती. त्याला "कोविड-19 टेस्ट क्‍युबिकल' असे म्हणतात. हे युनिट टेलिफोन बुथच्या आकाराचा चौकोन आहे. त्याच्या एका बाजूला वैद्यकीय अधिकाऱ्याला आत जाण्यासाठी दरवाजा आहे. तर, एका बाजूला निम्मी काच आहे. तिच्या खाली दोन मोठे होल आहेत. तसेच त्याला हॅण्डग्लोज जोडलेले आहेत. वैद्यकीय अधिकारी युनिटमध्ये गेल्यानंतर रुग्णाला काचेच्या बाजूच्या समोर स्टूलवर बसविले जाते. त्यानंतर हॅण्डग्लोजच्या होलमध्ये हात घालून वैद्यकीय अधिकाऱ्याला बॉक्‍सच्या आतूनच रुग्णाच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेता येणे शक्‍य होत आहे. त्यामुळे स्वॅब घेताना रुग्णाला शिंक किंवा खोकला आल्यानंतर उडणाऱ्या घशातील कणांपासून वैद्यकीय अधिकाऱ्याची सुरक्षितता होत आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा रुग्णालयात अशा प्रकारची दोन युनिट मिळालेली आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

Coronavirus : घरात बस भावा ! नाय तर साताऱ्यात रेड झाेनची हवा

मोफत तांदळाचा भात शिजतोय कुठं ?

वृत्तपत्र वितरणावर बंदीचा राज्याचा तुघलकी आदेश


कोविड-19 टेस्ट क्‍युबिकल युनिट'मुळे घशातील स्त्रावाचे नमुने घेणे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुरक्षित झाले आहे. अन्य ठिकाणीही अशी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 
डॉ. अमोद गडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT