पश्चिम महाराष्ट्र

सातारा : दाेन महिन्यांच्या बाळासाह चाैघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळच्या प्रहरी चाैघांचा मृत्यू झाला. त्यातील एक जण काेराेनाबाधित आहे. अन्य तिघांमध्ये दाेन महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. नागरीकांनी घाबरुन जाऊ नये, आवश्यकतेनूसारच घराच बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जावली तालुक्यातील एक पुरुष 58 वर्षीय कोविड बाधित रुग्णाचा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे आज (शुक्रवार) सकाळी मृत्यु झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व श्वसन संस्थेच्या तीव्र आजार झाला होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान वरळी, मुंबई येथून प्रवास करुन आलेली पाचगणी येथील 64 वर्षीय महिला गृह विलगीकरणात होती. या महिलेचा दम्याच्या आजाराने व ह्दयविकाराने मृत्यु झाला असून संशियत म्हणून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगिता चौगुले यांनी दिली आहे. तसेच घाटकोपर, मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या दाेन महिन्याचे बाळ कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे श्वास घेण्याचा त्रास होत होता. त्यास दाखल करण्यात आले होते. या दाेन महिन्याच्या बाळाचा मृत्यु झाला असून संशयित म्हणून घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्या व्यतरिक्त नांदलापूर (ता. कराड) येथील 60 वर्षीय महिला कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे संशियत म्हणून दाखल करण्यात आली होती. या महिलेचा मृत्यु झाला आहे. या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे.

दरम्यान क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 53, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 9, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 15 असे एकूण 111 जणांचे अहवाल निगेटिव्ह. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 35 जणांचे असे एकूण  146 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे. याबराेबरच  (गुरुवार, ता. 21) रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 22, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 87 असे एकूण 109 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 201 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 90 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 106 आहे तर मृत्यु झालेले 5 रुग्ण आहेत.

सातारा शहरातील मुख्य बाजारपेठ खूली हाेण्याचा मार्ग माेकळा

कऱ्हाड : शिरखुर्मासाठी लागणारी ड्रायफ्रुटची उलाढाल ठप्प

                        

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT