पश्चिम महाराष्ट्र

थांबा! व्हॉट्‌सऍपवर पाेस्ट करण्यापुर्वी हे वाचा

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः लॉकडाउनच्या काळात अफवा पसरवणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या व अस्थिर स्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात सायबर विभागाने कठोर पावले उचलली आहेत. सायबर विभागाने पश्‍चिम महाराष्ट्रात तब्बल 70 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात टिकटॉक, इन्स्ट्राग्राम, फेसबुक, ट्‌विटर व अन्य समाजमाध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांचा समावेश आहे. काही अदखलपात्र गुन्ह्यांचाही त्यात समावेश आहे. 

राज्यभरात व्हॉट्‌सऍपवर आक्षेपार्ह मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 141 गुन्हे दाखल झाले आहेत. फेसबुक पोस्ट्‌स शेअर केल्याप्रकरणी 129 गुन्हे दाखल आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पुणे ग्रामीण जिल्ह्यांत जवळपास 70 लोकांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. त्यात सातारा दहा, सांगली 12, पुणे ग्रामीण 27, कोल्हापूर 16, सोलापूर शहर व ग्रामीण नऊ गुन्ह्यांचा समावेश आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये कोणत्या भागात काय सुरू राहणार, कोणते बंद राहणार, याबाबत सोशल मीडियावर मेसेज फिरत आहेत. कुठला जिल्हा, कुठल्या झोनमध्ये येतो आहे, त्याचे आलेख, चार्टस दाखवणाऱ्यांवर कारवाई झाली आहे. 

सायबर सेलने केलेली विनंती... 

नागरिकांनी तुम्हाला आलेले मेसेज, फोटोज, पोस्ट कोणीही पाठविल्या तरी कृपया त्या लगेच फॉरवर्ड करू नका. 
मेसेजची सत्यता पडताळून मगच फॉरवर्ड करा. 
कोरोनाबाबतच्या काळात चुकीची माहिती व अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे. 
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. 
केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी करून दिलेले नियम व आदेशाचे पालन करा. 

कोरोनासारख्या बिकट कालावधीत नागरीकांची दिशाभूल होईल असा कोणताही मेसेज सोशल मिडीयावर फॉरवर्ड करणे अत्यंत धोकादायक आहे. नागरीकांना पॅनिक करणाऱ्या पोस्ट फारवर्ड केल्यास तो गुन्हा ठरतो आहे, त्यामुळे अशा नागरीकांवर कायदेशीर कारवाई होवू शकते. राज्यभरात अनेकांवर तशी कारवाई सुरू आहे. सध्याचा कोरोनाच्या कालावधीत नागरीकांनी अत्यंत जबाबदारीने वागून अशा पोस्ट फारवर्ड करणे टाळावे. 

- जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, सायबर क्राईम, पुणे

  • टिकटॉकवकर व्हिडिओ शेअरप्रकरणी 12 गुन्हे. 
  • ट्‌विटरद्वारे आक्षेपार्ह ट्‌विट केल्याप्रकरणी सहा गुन्हे. 
  • इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी चार गुन्हे. 
  • अन्य सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर 49 गुन्हे. 
  • राज्यभरात आतापर्यंत 177 संशयितांना अटक. 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचा नवा उच्चांक, चांदी मात्र उतरली; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

राज्यपालांकडे ४ वर्षांपासून विधेयक मंजुरीसाठी पडून, हे खोटं कसं म्हणता? सरन्यायाधीशांचा केंद्र सरकारला सवाल

Stock Market Opening: शेअर बाजारात खरेदी; निफ्टी 25,000च्या जवळ, कोणते शेअर्स वाढले?

महेश मांजरेकरांची लेक मराठी सिनेमात येणार? सई मांजरेकरला करायचंय मराठी चित्रपटात काम

Shocking News : भूतबाधा की मानसिक आजार? जन्मदात्या आईनं 15 दिवसांच्या बाळाला ठेवलं फ्रीजमध्ये; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण!

SCROLL FOR NEXT