पश्चिम महाराष्ट्र

CoronaFighters : जिवाचा धोका पत्करूनही कोरोनासंगे युद्ध 'त्यांचे' सुरूच

सकाळ वृत्तसेवा

सातारा : हो..। चाेवीस तास त्यांच्या डोक्‍यावर असते कोरोनाची टांगती तलवार पीपीटी कीटमध्ये अंग घालून कोरोना रुग्णांची, संशयितांची दिवसातील चौदा ते सोळा तास सेवा करत रहायचे, कुटुंबीयांशी दुरावाच काय पोटच्या पोरांची भेटही नाही घेऊ शकत. मग वाढदिवस साजरा करायचे दूरच. अशा या बिकट परिस्थीतीत सातारकरांच्या रक्षणासाठी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारीका, इतर कर्मचारी गेले 21 दिवस अहोरात्र झटत आहेत. आणिबाणीच्या या परिस्थीतीत ते करत असलेले काम खरोखर कौतुकास्पद आहे. 

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी देश व राज्यातील आरोग्य विभागाची टीम कार्यरत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीमही परिश्रम घेत आहे. कोरोना संसर्गाची संभाव्य परिस्थिती पाहता राज्याप्रमाणे जिल्ह्यातही 23 मार्चपासून संचारबंदी लागू झाली. तत्पूर्वीच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. कोरोना प्रसारावर निर्बंध आणण्याची जबाबदारी पेलतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाची टीमही सक्षमपणे कार्यरत राहील याकडे गांभीर्याने लक्ष दिले. त्याला योग्य प्रतिसाद देत जिल्ह्यामध्ये एक सक्षम यंत्रणा उभारण्यात जिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागाच्या टीमचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
 
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या नेतृत्वाखाली सर्वच आरोग्य विभागाच्या टीमने सांघिक कामाचे एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक संपूर्ण जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांतील व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालयातील कोरोना व दैनंदिन इतर रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्‍यक असलेल्या सर्व व्यवस्थेची, तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर धुमाळ ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांची व्यवस्था पाहात आहेत. त्यांच्या जोडीला वर्ग एकचे डॉ. सुधीर बक्षी, रामचंद्र जाधव, सुनील सोनावणे, राजाराम काटकर यांची टीम विविध आवश्‍यक गोष्टींच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवत आहेत.
 
विलगीकरण कक्षातील रुग्णांवरील उपचारासाठी या टीमला डॉ. ज्ञानेश्‍वर हिरास व सायली सुपेकर, डॉ. सारिका बडे या कार्यरत आहेत. जिल्हा रुग्णालयातील दाखल झालेल्या विविध कोरोनासदृश्‍य लक्षणे असलेल्या रुग्णांचे नमुने घेण्यामध्ये डॉ. अरुंधती कदम, सचिन विभूते, चंद्रशेखर कारंजकर, राखी सुरवसे (माने), मनोज कवडे, डॉ. गुरव, प्रकाश पोळ, राहुल खाडे व डॉ. भास्कर हेही आपले योगदान देत आहेत. दररोज सकाळी व सायंकाळी डॉ. गडीकर यांच्या नेतृत्वाखाली कोअर समितीची बैठक होते. त्यामध्ये वर्ग एकचे सर्व अधिकारी, तसेच अपघात विभागात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असतो. त्यामध्ये दिवसभराचे काम, शासनाकडून आलेले निर्देश, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये आलेल्या सूचना, त्यानुसार करायची कार्यवाही, उपचार पुरविण्यात येणाऱ्या त्रुटी, कमतरता यावर चर्चा होऊन मार्ग काढला जातो. 23 मार्चपासून अविरतपणे हे अधिकारी दररोज 14 ते 16 तास कार्यरत आहेत. संचारबंदीमुळे संपूर्ण जिल्हा घरात असताना या लोकांना एक दिवसही सुटी घेता आलेली नाही. उलट कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना दूर राहावे लागत आहे. आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुणे घेणे, त्याचबरोबर दररोज सुमारे शंभर ते दीडशे जणांची कोरोना कॉर्नरमध्ये तपासणी करण्याचे काम ही टीम करत आहे. त्यामुळे सर्व सातारकरांनी टीमच्या कार्याला सलामच केला पाहिजे. 

मुलीचा वाढदिवसही नाही 

संचारबंदीमुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व कुटुंबांत एकत्र आहेत; परंतु कुटुंबीयांच्या जिवास धोका होऊ नये यामुळे वैद्यकीय टीमला त्यांच्यापासूनच दूरच राहावे लागत आहे. अतिरिक्‍त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने व राखी सुरवसे (माने) हे दांपत्य जिल्हा रुग्णालयातच कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना तर आपली मुले आजी- आजोबांकडेच ठेवावी लागली आहेत. नुकताच त्यांच्या मुलीचा वाढदिवस झाला; परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीमुळे त्यांना तोही साजरा करता आला नाही. 

परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचेही योगदान 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून परिचारिका, तंत्रज्ञ व चतुर्थ श्रेणी कर्मचारी जिवाचा धोका पत्करून काम करत आहेत. अगदी कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतर त्याचा अंत्यविधी करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर या कर्मचाऱ्यांचे योगदानही मोलाचे ठरले आहे. संपूर्ण जिल्हा त्यांच्या या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. 

झटपट पैसे कमवण्यासाठी युवकांच्या माध्यमातून दारुचा पूरवठा 

Video : अथक परिश्रम आणि भरघोस खर्च करूनही पदरात फक्त अश्रुच

Video : हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत जमीनदोस्त; लाखोंच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT