पश्चिम महाराष्ट्र

अखेर 'त्या' दुकानदाराचा परवाना झाला रद्द; रेशनिंगचा काळाबाजार आला अंगलट

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कोरोना आजाराच्या काळातही रेशनिंगचा काळाबाजार करण्याचा प्रकार वहागाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराला चांगलाच अंगलट आला आहे. त्याने काळाबाजार केल्याने त्याचा दुकान परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी तसा आदेश दिला आहे.

वहागाव येथील स्वस्त धान्य दुकानदार गौतम ताटे हा धान्य वितरणानंतर शासन नियमानुसार ग्राहकांना कसलीही पावती देत नव्हता. दुकानाच्या धान्यसाठ्याबाबत कसलेही फलक लावले नव्हते. ग्राहक यादीही त्याच्याकडे नव्हती. पावती पुस्तक शासनाकडे सादर केले नव्हते. साठा बुकमध्ये व विक्री रजिस्टरमध्ये खाडाखोड होती. त्याठिकाणी शासनाची कसलीही स्वाक्षरी नव्हती. तपासणीत या त्रुटी आढळून आल्या होत्या. दुकानाची वेळ व सुटीचा दिवसही ग्रामस्थांना माहिती नव्हता. त्यामुळे ग्रामपंचायतीने ठराव करून ताटे यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली होती.

शासनाने केलेल्या तपासणीत ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले होते. शासनाचा मंजूर धान्य कोठा असतानाही दुकानदाराकडे तपासणीवेळी शासनाला दिसला नाही. त्यामुळे तो काळ्या बाजाराने धान्याची विक्री करीत आहे, असेच स्पष्ट झाले होते. ग्रामस्थांना कमी धान्य देऊन त्यांच्याकडून ज्यादा पैसे घेत असल्याची माहिती गावातील सर्व्हेदरम्यान पुढे आली होती.

कोरोनासारख्या संकटकाळातही दुकानदार त्या स्थितीचा गैरफायदा घेऊन ग्राहकांना नियमाप्रमाणे धान्य वाटप करत नव्हता. धान्य दिले तर कसलीही पावती देता नव्हता. धान्य कमी देऊन ज्यादा पैसे घेत होता. त्याची ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार तपासणी झाली. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानदार ताटेचा रास्त भाव दुकान परवान्याची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करून सदर दुकान परवाना रद्द केला असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. रेशनिंग काळ्या बाजाराबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तहसीलदार वाकडे यांच्यासह संबंधित यंत्रणेकडे तक्रारी केल्या होत्या.

Lockdown : पाेलिस तपास सुरु; हजाराे दारुच्या बाटल्या चाेरीस

लाकडे जमविण्यापासून ते सरण रचण्यापर्यंत प्रशासनाला कसरत करावी लागली. अंत्यसंस्कार गाडीसाठीही बराच वेळ खोळंबा झाला. सविस्तर वाचा या लढ्याविषयी 

सातारा जिल्ह्यातील नागरीकांसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा महत्वपुर्ण निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

Pune PMC Promotion Race: अतिरिक्त आयुक्तपदासाठी पुणे मनपातील चार वरिष्ठ अधिकारी दावेदार; पदोन्नती प्रक्रिया, सत्ताधाऱ्यांची संमती व नगरविकास विभागाची मंजुरी ठरणार निर्णायक

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

SCROLL FOR NEXT