पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सेवानिवृत्त महिला पोलिस उपनिरीक्षकही; सकाळ रिलीफ फंडा ला दिली मदत

सकाळ वृत्तसेवा

वाई : कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून, सकाळ रिलीफ फंडासाठी आर्थिक मदत करणाऱ्या लोकांचा ओघ वाढत आहे. वाईतील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक श्रीमती चंद्रकला शंकर गाढवे यांनी या रिलीफ फंडासाठी 15 हजार रुपयांची, तर महाबळेश्वर आगारातील वाहतूक नियंत्रक चंद्रकांत बाबूराव वळकुंदे यांनी एक हजार 111 रुपयांची मदत आज दिली.
 
श्रीमती गाढवे यांचे पती मुंबईत वाहतूक पोलिस होते. त्यांचे 1959 मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जागी श्रीमती चंद्रकला गाढवे या हवालदार म्हणून मुंबई पोलिस विभागात भरती झाल्या. जे. ए. पी. यु. विभागात त्यांनी 35 वर्षे प्रामाणिक सेवा बजावली. 2000 मध्ये पोलिस उपनिरीक्षक या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्या वाईत भद्रेश्वर अपार्टमेंट मधली आळी येथे स्थायिक झाल्या. 
आज देशावर कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट कोसळले आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने राज्यात अत्यावश्‍यक वैद्यकीय सुविधा, तसेच विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सकाळ रिलीफ फंडासाठी मदतीचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देऊन श्रीमती चंद्रकला गाढवे यांनी आपल्या मासिक निवृत्ती वेतनातील पाच हजार रुपये स्व: खर्चासाठी ठेऊन उर्वरित 15 हजार रुपयांची रक्कम सकाळ रिलीफ फंडासाठी दिली.

त्या म्हणाल्या, ""देश संकटात असताना सकाळ रिलीफ फंडाने हाती घेतलेल्या सामाजिक कार्यात आपणही एक नागरिक या नात्याने आर्थिक मदतीचा हातभार लावून खारीचा वाटा उचलावा या हेतूने ही मदत दिली.'' यापूर्वी अनेक नैसर्गिक आपत्तीच्या काळात सकाळ रिलीफ फंडाने पुढाकार घेऊन विधायक काम उभे केले आहे. त्या वेळीही फूल ना फुलांची पाकळी म्हणून या फंडासाठी आर्थिक मदत केल्याचे त्यानी सांगितले. 
महाबळेश्वर आगारातील वाहतूक नियंत्रक चंद्रकांत वळकुंदे यांचे मूळ गाव खंडाळा असून, ते सध्या सिद्धनाथवाडी (वाई) येथे राहतात. त्यांना सार्वजनिक व सामाजिक कामाची आवड असून, खंडाळा येथील एकता क्रीडा मंडळाचे ते 25 वर्षे सचिव, एकता सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक, महाबळेश्वर आगाराचे मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे माजी सचिव, माजी विभागीय उपाध्यक्ष व सध्या कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक जाणिवेतून त्यांनीही सकाळ रिलीफ फंडाला मदत दिली आहे.

CoronaFighters : जिवाचा धोका पत्करूनही कोरोनासंगे युद्ध त्यांचे सुरूच 

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी माजी सैनिकाचा पुढाकार; सकाळ रिलीफ फंडा ला दिली मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: किमान शिक्षकांवर तरी अशी वेळ येऊ नये, हे सरकार विसरतंय का? - विजय वडेट्टीवार

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT