पश्चिम महाराष्ट्र

साखर झोपेतच सातारा जिल्ह्याला धक्का; 52 पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील काेराेना बाधीतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी (ता.२६) अवघे सहा बाधित रुग्ण सापडल्याने नागरीकांना थाेडासा दिलासा मिळाला हाेता. ताेच आजची (बुधवार) सकाळी साखर झाेपेत असलेल्या जिल्ह्यातील नागरीकांना काेराेनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने पुन्हा एकदा हादरा दिला. तब्बल ५२ नव्या रुग्णांची भर पडली असून वाई तालुक्यातील आसले व पाटण तालुक्यातील जांभेकर वाडी येथील बाधितांचा मृत्यू झाला आहे.  सातारा जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३९४ वर तर मृतांची संख्या अकरा वर पोहचली आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
 
मंगळवारी (ता.२६) रात्री उशिरा नवारस्ता ( पाटण ) येथील 12 वर्षीय सारी रुग्ण, वानरवाडी येथील प्रतिबंधित क्षेत्रातून 25 वर्षीय गरोदर महिला, मुंबई येथून आलेली पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 30 वर्षीय महिला, मुंबईवरून आलेली उंब्रज  (ता. कराड) येथील 29 वर्षीय महिला आणि पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले हाेते.

सातारा जिल्ह्यात मुंबईहून तसेच परराज्यातून आलेल्यांची बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसापासून झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारचा (ता.२६)  अपवाद वगळता बाधीतांच्या आकडा सातत्याने दोन अंकीच येत आहे. मंगळवारी केवळ कऱ्हाड व पाटण तालुक्यातील प्रत्येकी तीन रुग्ण आढळले. आज (बुधवार) सकाळी मात्र पुण्याच्या एन सी सी एस कडून आलेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने ५२ बाधित रुग्ण वाढले आहेत. यात कऱ्हाड तालुक्यातील तीन बाधितांचा समावेश आहे. त्यामध्ये म्हासोली येथील एक व खराडे येथील दोन बाधित सापडले.  म्हासो ली येथील साखळी यापूर्वीची असून खराडे येथे नव्याने रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. याबराेबरच वाई तालुक्यातील असले येथील मुंबई वरून आलेला मधुमेह असलेला 67 वर्षीय  बाधिताचा  तसेच जांभेकरवाडी (ता. पाटण) येथील 70 वर्षीय बाधित महिलेचाही मृत्यू झाला आहे.

बाप मेला होता...अन्‌ प्रशासनातील माणुसकीही!

Coronavirus : राज्यात कोरोना अवरेना, दिवसभरात इतक्या नव्या रुग्णांची भर आणि बरे होणाऱ्यांची संख्या...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT