पश्चिम महाराष्ट्र

नर्सच्या वडिलांनाही काेराेना; साखळी पुन्हा वाढू लागली

सकाळ वृत्तसेवा

सातारा  :  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारा ठाणे येथून प्रवास करुन आलेला 26 वर्षीय व 67 वर्षीय पुरुष व मुळची सोलापूर जिल्ह्यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेली एक 32 वर्षीय महिला व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे कोविड बाधित रुग्णाचा निकट सहवासित म्हणून दाखल असणारे 53 व 22 वर्षीय नागरिक असे एकूण पाच नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 26, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 64 व उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 3 असे एकूण 93 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या 138 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 70 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 66 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

दरम्यान उंब्रज ता.कराड येथील उपजिल्हा रूग्णालयात फार्मासिटी विभागात काम करणार्या नर्सच्या संपर्कात आलेल्या वडिलांसह अन्य एका निकटवर्तीय युवकाचा रविवारी रात्री दुसरा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. यामुळे उंब्रजसह परिसरात पुन्हा हादरला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पोलीस व आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे.
     
उंब्रज ता. कराड येथील उपजिल्हा रुग्णालय कराड येथे फार्मासिटी विभागात काम करणाऱ्या युवतीचा अहवाल पाॅझीटीव्ह आला होता. यानंतर १४ मे रोजी युवतीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर काल रात्री उशिरा युवतीच्या संपर्कात आलेल्या तिच्या वडिलांसह शेजारी राहणारा युवकाचा दुसरा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. यामुळे चोरे रोड परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आत्तापर्यंत उंब्रजमध्ये चार करोना पाॅझीटीव्ह रुग्ण आढळ्याने नागरीकांच्यात घबराट निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याचे उंब्रज प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी सांगितले. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उंब्रज पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले आहे.

कऱ्हाडात कोरोनाचा राक्षस शंभरीच्या उंबरठ्यावर

खून झालेल्या अमरावतीच्या कामगाराचे नातेवाईकच सापडेनात

चंचळीतला गुजरातहून परतल्यावर पाॅझिटिव्ह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rule: घेतलेलं कर्ज परत नाही केलंत? तर तुमचा फोन लॉक होईल, आरबीआयकडून नवा नियम आणण्याची तयारी

लई भारी! दुर्मिळ आजारने त्रस्त असलेल्या बाळाला जॅकलिनची मदत, उचलला शस्त्रक्रियेचा खर्च, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates Live : ज्येष्ठ काँग्रेस नेते, केरळ विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि केपीसीसीचे माजी अध्यक्ष पी. पी. थानकाचन यांचे निधन

Sinnar News : सिन्नर एमआयडीसीत नवीन अग्निशमन बंब दाखल, उद्योगांना मोठा दिलासा

Beed Crime : हुंड्यासाठी अजून एक बळी; गेवराईच्या २२ वर्षीय नवविवाहितेने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT