पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड : एका क्लिकवर मिळवा किराणा माल घरपाेच

सचिन शिंदे

कऱ्हाड ः कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कऱ्हाड शहरात शासनाकडून किराणा माल नागरिकापर्यंत पोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ती यंत्रणा कार्यान्वित होण्यास विलंब होत आहे. अशा स्थितीत कऱ्हाडच्या गणेश प्रल्हाद पवार या युवकाने किराणासह भाजीपाला घरपोच करण्याचे ऍप डेव्हलप केले आहे. त्याला प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनीही मान्यता दिली आहे. त्या ऍपव्दारे सामान्यांनी त्यांना हवे असणाऱ्या साहित्याची मागणी मोबाईलव्दारे त्या ऍपवर नोंदवल्यास त्यांना त्या वस्तू घरपोच मिळणार आहेत. त्याच्या ऍपव्दारे किराणा, भाजीपाला घरपोचला नागरिकांनी पसंती दिली आहे.

थांबा! व्हॉट्‌सऍपवर पाेस्ट करण्यापुर्वी हे वाचा
 
पवारला चेन्नईतील सर्व्हे हर्ट कंपनीने तयार केलेले ऍप नेटवर आढळले. त्याने ते डाउनलोड करून घेतले. त्यानुसार त्या ऍपने दिलेल्या पाथ वेवरून त्याने कऱ्हाड शहरात किराणा माल, भाजीपाल्यासारख्या सुविधा नागरिकांना घरपोच कशा देता येतील, याचा विचार केला. त्यानुसार त्या ऍपला सात ते आठ वेळा अपग्रेडेशन केले. त्यात सुधारणा केल्या. त्यानंतर ते ऍप प्रॉपर रन होण्यास तयार झाले. त्याची पहिली चाचणी त्यांनी प्रभाग क्रमांक सातमध्ये घेतली. ती चाचणी यशस्वी झाली. त्यावेळी त्यांनी त्याबाबत प्रांताधिकारी दिघे व अन्य शासकीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली.

त्यांनीही त्या ऍपमधील बारीक गोष्टी समजावून घेतल्या. काल रात्री उशिरा त्या ऍपला शासकीय पातळीवर मंजुरी देऊन ते ऍपच्या प्रत्यक्ष कामास परवानगी दिली आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर त्या ऍपवर आता शहरातील प्रत्येक प्रभागातील दुकानदारांची यादी प्रभानिहाय अपलोड केली आहे. त्यात 66 दुकानदार आहेत. त्याशिवाय भाजीपाला पोच करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे जोडली आहे. त्याव्दारे सेवा सुरू आहे. साहित्य पोच करण्याचे कोणतेही चार्जेस लावले जात नाहीत. 

Coronavirus वाचा : सातारा जिल्ह्यासाठीची गुड न्यूज

खरंच... तांबवेकर लई भारी! 

...असा करा ऍपचा वापर 

घरपोच किराणा, भाजीपाला हवा असल्यास गणेश पवारने तयार केलेल्या ऍपचा वापर करता येतो. त्यासाठी त्या ऍपवर गेल्यास नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, प्रभाग क्रमांक, त्या प्रभाग क्रमांकातील तुमच्या जवळील किराणा दुकानदाराचे नाव अशी माहिती प्रथम त्या ऍपवर भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या जिन्नसांची यादी त्यात भरायची, त्यानंतर ती सगळी माहिती ऍपवर सबमिट करायची. ती माहिती त्या ऍपव्दारे श्री. पवार यांना मिळते. पवार ती माहिती त्या दुकानदारांपर्यंत व्हॉट्‌सऍपवर पोचवतात. त्यानंतर ते साहित्य संबंधित नागरिकांपर्यंत पोचवले जाते.

किराणा मालासाठी क्लिक करा 
https://surveyheart.com/form/5ead341f5a179e1ef9c4e7c6#welcome

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT