पश्चिम महाराष्ट्र

विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मुख्याध्यापकास सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा

सातारा : लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने 12 वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या काशीळ (ता. सातारा) येथील तत्कालीन मुख्याध्यापकास जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. संजय प्रतापराव जाधव (वय 50, मूळ रा. नांदगाव, ता. सातारा, सध्या रा. ज्ञानप्रसाद अभियंता सहकारी गृहनिर्माण संस्था, संभाजीनगर, सातारा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 

या पीडित मुलीच्या वडिलांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. नऊ ऑक्‍टोबर 2016 रोजी संबंधित मुलगी इतर मुलींसह शाळेतील संगणक कक्षामध्ये कार्यानुभवाच्या तासासाठी गेली होती. त्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे शिक्षकांनी खिडकी उघडण्यास सांगितले. त्यानंतर संबंधित मुलगी खिडकी उघडण्यासाठी क्‍लासच्या बाहेरील व्हरांड्यात गेली. त्या वेळी लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने तिचा विनयभंग केला. याबाबत संबंधित मुलीने वडिलांना सांगितले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. या प्रकरणी जाधवला अटक झाली होती.

हेही वाचा -  महाबळेश्वर : नीलम नारायण राणेंसह तीस मिळकतधारकांना नोटीस 

बोरगाव पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. साक्षीदारांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील एन. डी. मुके यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश मोरे यांनी जाधवला दोषी ठरवले. त्याला तीन वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी वकिलांना पोलिस प्रॉसिक्‍युशन स्कॉडमधील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT