पश्चिम महाराष्ट्र

पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत 'ही' सूचना पाेचवा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सकाळ वृत्तसेवा

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापनेच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरू केलेल्या राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानात सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे. तसेच हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत ते पोचवावे, अशी सूचना सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. 

राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानाच्या नियोजनाची बैठक राष्ट्रवादी भवनात पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सचिन बेलागडे, दीपक पवार, सेवादल संघटक राजेंद्र लावंघरे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शफिक शेख, महिला आघाडी अध्यक्षा समिंद्रा जाधव, कार्याध्यक्षा जयश्री पाटील, सरचिटणीस नलिनी जाधव, भरत देशमुख उपस्थित होते. 

बाळासाहेब पाटील म्हणाले, ""येत्या दहा जूनला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 22 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या अभिप्राय अभियानाची घोषणा केली आहे. राज्यभरातील पाच लाख पदाधिकाऱ्यांशी श्री. पाटील संवाद साधणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी या अभियानात सहभागी व्हावे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक बुथ सदस्यांपर्यंत या अभियानाची लिंक पोचली पाहिजे, यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. अत्यंत प्रभावीपणे हे अभियान राबविल्यास आपल्याला पक्षबांधणी व आगामी काळात पक्षाची वाटचाल सक्षमपणे करता येणार आहे.'' 

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज; वेळापत्रक जाहीर

सरकार आमचं नाही; काॅंग्रेसच्या महाराष्ट्रातील माेठ्या नेत्याची क्लिप व्हायरल

चर्चाच चर्चा विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा : कॉंग्रेस नेत्याच्या कार्यकर्त्यास संधी मिळणार का ?

पहा शैक्षणिक क्षेत्रातील अभिनव प्रयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

Junnar 12th Result: जुन्नर तालुक्यात बारावीचा निकाल ९१.४९ टक्क्यांवर; मुलींची बाजी, सात कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के

SCROLL FOR NEXT