करंजे (सातारा) - श्रीपतराव पाटील हायस्कूल.
करंजे (सातारा) - श्रीपतराव पाटील हायस्कूल. 
पश्चिम महाराष्ट्र

पांढऱ्या कागदावर पतंग, खेळणी, भाजी मंडई!

सकाळवृत्तसेवा

सातारा - निरभ्र आकाश, कोवळे ऊन, मधूनच येणाऱ्या अन्‌ प्रसन्न करणारी थंड हवेची झुळूक अंगावर घेत बालचित्रकरांनी पांढऱ्या शुभ्र कागदावर आपल्या कल्पनेच्या कुंचल्यातून विविध रंगांच्या प्रमाणबद्ध रेषांतून चित्रे रेखाटली आणि पतंग उडवणाऱ्या मुलांबरोबरच तऱ्हेतऱ्हेची खेळणी, गजबजलेली भाजी मंडई अन्‌ रिमझिम पडणारा पाऊस अशा सुंदर कलाकृती बघता बघता साकारल्या. ‘सकाळ’च्या वतीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेस आज जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्यातील विविध केंद्रांवर आज ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा झाली. या स्पर्धेस नेहमीप्रमाणे यावर्षींही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. माण-खटावपासून पाटण-जावळी, महाबळेश्‍वरच्या डोगरदऱ्यांतील तसेच सातारा, कोरेगाव, फलटण, कऱ्हाड, वाई अशा शहरी भागातील हजारो विद्यार्थी आजच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांत पडलेल्या थंडीच्या कडाक्‍यामुळे आज स्पर्धा सकाळी नऊ वाजता सर्वत्र एकाचवेळी सुरू झाली. बहुतेक ठिकाणी स्पर्धेच्या उद्‌घाटनास स्थानिक मान्यवरांनी हजेरी लावली होती. पहिली-दुसरी, तिसरी ते चौथी, पाचवी ते सातवी अन्‌ आठवी ते दहावी अशा चार गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मुलांबरोबरच मुलींचाही मोठा सहभाग होता. पाचगणी - महाबळेश्‍वरच्या थंडीतही मुले भल्या सकाळी स्पर्धेच्या केंद्राच्या दिशेने येत होती. अंगात स्वेटर घालून आई-बाबांचा हात धरून छोटे उत्साही बालचित्रकार गडबडीने स्पर्धा केंद्राकडे येतानाची दृश्‍ये आज सर्वत्र पाहावयास मिळत होती. 

मेण खडू, रंगीत शिसपेन्सिली तसेच वॉटर कलरचा वापर करत मुलांनी आपल्या कल्पनेप्रमाणे दिलेल्या विषयांवर सुंदर चित्रे रेखाटली. पहिली-दुसरीच्या ‘अ’ गटातील बालचित्रकारांनी आपला दररोजच्या पाहण्यातील मोबाईल, आवडते खेळणे, त्यातही लाकडी बैलगाडी, मोटार अशी खेळणी रेखाटण्यास प्राधान्य दिले होते, तर तिसरी-चौथीच्या ‘ब’ गटातील विद्यार्थ्यांनी पतंग उडवणारा मुलगा साकारण्यास प्राधान्य दिले. पर्यावरण प्रेम मुलांतून खोलवर रुजले गेल्याने पाचवी ते सातवीच्या ‘क’ गटातील विद्यार्थ्यांनी दाट जंगल रेखाटण्यास तर आठवी ते दहावीच्या ‘ड’ गटातील विद्यार्थ्यांनी पडणारा पाऊस अन्‌ शेकोटीला प्राधान्य दिले होते. 

मुले चित्र काढताना त्यातील प्रमाणबद्धता, समर्पक रंगसंगती साधताना दिसत होते. एकूणच बहुतेक विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून सुंदर चित्रे रेखाटली. 

मुलांच्या जिद्दीचे होत होते कौतुक!
स्पर्धेत पहिली-दुसऱ्या इयत्तेमधील मुलांचा सहभाग लक्षणीय होता. दिव्यांग मुलांनीही हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एका हाताने सारे साहित्य सावरतानाच सुंदर चित्रे काढणारी मुले, आई- वडिलांच्या खांद्यावर बसून येणारी पायाने अपंग असणारे विद्यार्थी तसेच अपघाताने फ्रॅक्‍चर झालेल्या हाताला प्लॅस्टर केलेले असतानाही उत्साहाने चित्रे रेखाटणाऱ्या मुलांच्या जिद्दीचे सारेजण कौतुक करत होते.

दुसरी पिढीही ‘सकाळ’सोबत
‘सकाळ माध्यम समूह’ गेली ३१ वर्षे बालमित्र चित्रकला स्पर्धा राबवत आहे. या स्पर्धेत कोणाची तिसरी, तर कोणाची दुसरी पिढी सहभागी होत आहे. तेव्हाची कल्पनाशक्‍ती, निर्णयक्षमता जुन्या पिढीने कुंचल्यातून साकारली. आता त्यांचीच दुसरी पिढीही त्यापेक्षा अधिक शक्‍तीने कल्पनाशक्‍ती, निर्णयक्षमता कुंचल्यातून साकारत आहे. त्याचे अप्रुप करावे तितके थोडकेच.

वर्षा देशपांडे, ध्विजेंद्र देशपांडे
मी इयत्ता चौथीत असताना साताऱ्यातील हत्तीखाना शाळेमध्ये बालमित्र चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला होता. आज माझा मुलगा ध्विजेंद्र हा दुसरीमध्ये असून, तोही स्पर्धेत सहभागी आहे. ‘सकाळ’ने पिढ्यान्‌ पिढ्याने घडविण्याचे काम या चित्रकला स्पर्धेत सुरू ठेवले आहे. भविष्यात अशाच पध्दतीने ही चित्रकला व्यापक स्वरूपात राबवावी, असे वर्षा देशपांडे यांनी सांगितले.

प्रियांका सुतार, शरण्य सुतार
वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंत बालमित्र चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला होता. आता माझा मुलगा शरण्य हा दुसरीत असून, तोही स्पर्धेत सहभागी झाला आहे. त्याचा खूप आनंद वाटतो. या स्पर्धेने मुलांत धाडस, निर्णयक्षमता, कल्पनाशक्‍ती वाढत आहे. मुलांसाठी सर्वोत्कृष्ट व्यासपीठ आहे, अशी भावना प्रियांका सुतार यांनी व्यक्‍त केली.

सुलक्षणा महापुरे
अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात असताना २००६ मध्ये या स्पर्धेत मी सहभागी होते. आता माझा मुलगा गोडोलीतील नगरपालिका शाळेत इयत्ता पहिलीत असून, तोही स्पर्धेत आहे. बुजलेली मुले या स्पर्धेतून व्यक्‍त होत आहेत. जगाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वास्तववादी आहे, की काल्पनिक हेही समजते. ‘सकाळ’ने हा उपक्रम अविरतपणे सुरू ठेवावा, असे सुलक्षणा महापुरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT