कोयना नदीवरील जुन्या पुलाला मिळणार नवसंजीवनी
कोयना नदीवरील जुन्या पुलाला मिळणार नवसंजीवनी 
पश्चिम महाराष्ट्र

साताराः कोयना नदीवरील जुन्या पुलाला मिळणार नवसंजीवनी

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा): येथील कोयना नदीवरील जुन्या कोयना पुलाला सव्वाशेहून अधिक वर्षानंतर नवसंजीवनी मिळणार आहे. तो पुल वाहतूकीला धोकादायक असल्याने सध्या चारचाकी वाहतूक बंद आहे. मात्र, बांधकाम विभागाने पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी तीन कोटी ६७ लाख ४२ हजार ८३२ रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे ब्रिटीश काळात कोकणाशी जोडला जाणारा पूल पुन्हा कार्यरत होणार आहे.

नऊ महिन्यात पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. चार चाकी धावण्याएवढा पुल मजबुत करण्यात येईल. तब्बल सव्वाशेहुन अधिक वर्षानंतर ब्रिटीशकालीन पुल दुरुस्ती होणार आहे. ब्रिटीशांनी सव्वाशे वर्षापुर्वी बांधलेला जुना कोयना पुल अजुनही दुचाकीसाठी सुरु आहे. त्यावरुन वाहतूक सुरु होती. मात्र ब्रिटीशांनीच पुलाला १०० वर्षाहुन अधिक काळ झाल्याने तो वाहतुकीस बंद करावा असे पत्र पाठवल्याने संबंधित पुलावरुन चारचाकीसह अवजड वाहतुक १९७६ साली बंद करण्यात आली. सध्या फक्त दुचाकीची वाहतुक त्या पुलावरुन सुरु आहे. दुचाकी गेली तरी तो पुल हादरतो. तो पुल लोखंडी असल्याने त्यामध्ये सस्पेंशनसाठी बेअरींगचा वापर करण्यात आला आहे. ती बेअरींग खराब झाली आहेत. त्याचबरोबर पुलाचे जे चार पिलर कामयस्वरुपी पाण्यात असतात ते झिजले आहेत. ते मजबुत करुन पुलाची पुर्ण दुरुस्ती केली तर त्यावरुन चारचाकी वाहतुक सुरु होवू शकते असे मत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात वर्षापुर्वी व्यक्त केले होते. त्यासाठी संबंधित पुलाच्या दुरुस्तीचा आराखडाही तयार करण्यात आला.   

बांधकाम विभागाने पुलाच्या दुरुस्तीचे ३ कोटी ६७ लाख ४२ हजार ८३२ रुपये मंजुर केले आहेत. कऱ्हाड शहरामध्ये चारचाकीसह अन्य वाहनांना येण्यासाठी कोल्हापूर नाक्यावरुनच यावे लागले. त्यामुळे तेथे वाहतुकीचा ताण येवून सातत्याने कोंडीही होते. जुन्या पुलावरुन चारचाकीची वाहतुक सुरु झाल्यामुळे शहरात येण्यासाठी वाहनांना दोन मार्ग उपलब्ध होतील.

'सकाळ'चाही पाठपुरावा
जु्न्या कोयना पुलाची दुरुस्ती केल्यानंतर पुलावरुन चारचाकी वाहतुक सुरु होवु शकते असा प्रस्ताव बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षापुर्वी तयार केला होता. त्याचाच संदर्भ घेवुन दैनिक सकाळनेही या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा करुन त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करावा अशी भुमिका घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेसाठी काँग्रेसने राम मंदिराचा अपमान केला - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT