tiger
tiger 
पश्चिम महाराष्ट्र

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शिकाऱ्यांना रोखण्यासाठी उपाययोजना

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड : जंगली पायवाटांवरून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या शिकारी तांड्यांना रोखण्यासाठी शासनाने सुमारे 50 लाखांची भरीव तरतूद केली आहे. त्या शिकारी रोखता याव्यात, यासाठी पाटण तालुक्यात सहा वेगवेगळ्या ठिकाणी संरक्षक कुटी उभा करण्याच्या कामास शासनाने नुकतीच मंजूरी दिली आहे. त्यानुसार जंगली पायवाटांवर आता सरंक्षक कुटीतूनच वॉच असणार आहे. त्यामुळे कोकण भागातून येणाऱ्या शिकाऱ्यांसह अन्य लोकांवरही त्यामुळे निर्बंध लागणार आहे.

संरक्षक कुटीत दोन व्यक्तींची राहण्याची सोय असावी, अशा ढाच्याचीच ती कुटी असणार आहे. येत्या महिनाभरात त्याचे काम पू्र्ण करून प्रत्यक्षात त्या कुटी उभा करण्याचे आदेशही वन मंत्रालयाने दिले आहेत. 

साताऱ्यासह कोल्हापूर, रत्नागीरी व सांगली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकरला आहे. त्याच्या कोकणकड्यासह सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अनेक पायवाटांवर शिकारी लोकांची नेहमीच वर्दळ असते. बंदुकांसह हातबॉम्ब घेवून लोक श्वापदांच्या शिकारीसाठी येताना दिसतात. आज अखेर वन विभागाने किमान पाच टोळ्यांतील तीस लोकांना जेरबंद केले आहे. मात्र तरिही कोकण कड्यापासून पाटण व कोयनेच्या जंगलात येणाऱ्या शिकाऱ्यांच्या तांड्यावर निर्बध लावता येत नव्हता. ती स्थिती अनेकदा शासनाच्या समोर आणली गेली.  मात्र त्यासाठी होणारी तरतूद नेहमीच हुलकावणी देत राहिली. मध्यंतरी संरक्षक कुटीच्या प्रश्नावर तत्वतः शासनाने मंजूरी दिली. मात्र त्याच्या निधीची तरतूद करण्यास विलंब केला. मात्र अलीकडेच त्या सरंक्षक कुटी उभा करण्यासाठी शासनाने 50 लाखांची तरतूद केली आहे. त्या माध्यमातून अत्यंत चांगल्य पद्धतीच्या संरक्षक कुटी व्याग्र प्रकल्पात उपाय करण्यात येणार आहेत. किमान दोन माणसांची राहण्याची सोय व त्यातच निरिक्षणाचीही सोय असावी, असे आदेश वन मंत्रालयाने दिले आहे. त्यामुळे त्याच ढाच्याची संरक्षक कुटी आता लवकरच व्याघ्र प्रकल्पात दिसणार आहे. 

पहिल्या टप्प्यात सहा गावात संरक्षक कुटी उभारणार आहेत. त्यासाठी पाटण तालुक्यातील सहा गावांची वन विभागाने निवड केली आहे. ती गावे कोकण भागाला जोडल्या जाणाऱ्या रस्त्यालगतची आहेत. घनदाट जंगल, तेथे असलेली अवघड स्थिती व कड्याच्या बाजू लक्षात घेऊन त्या गावांची निवड केली आहे. त्यात ढेबेवा़डी परिक्षेत्रातील हुंबरणे, आटोली व कारळे, चांदेली अभयारण्यातील कोळणे व वाघणे, कोयना भागातील चांदोली अभयारण्यातील रासाटी या गावांचा त्यात समावेश आहे. हुंबरणेला आठ लाख 32 हजार, कोळणेला सहा लाख 40 हजार, रासाटीला नऊ लाख 90 हजार, कारळेला आठ लाख 22 हजार, वाघणेला नऊ लाख 90 हजार व आटोलीला आठ लाख 32 हजार रूपये मंजूर आहेत. त्या कामांच्या निविदाही जाहीर झाल्या आहेत. येत्या 45 दिवसात ते काम पूर्ण करून प्रत्यक्षात संरक्षक कुटी त्या त्या गावात उभा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT