कापशी (ता.फलटण) येथील शरयु साखर कारखान्याला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी भेट दिली. 
पश्चिम महाराष्ट्र

शरयु कारखाना राज्यासाठी दिशादर्शक ठरेल : शरद  पवार

संदीप कदम

फलटण शहर : साखरेच्या दरातील चढउतार, वाढलेली स्पर्धा यात तग धरून राहण्यासाठी साखर कारखान्यांना ऊस पुरवणारा उत्पादक समाधानी ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापनातील नेटकेपणा आणि कामगारांमधील कुशलता या जोरावर उत्पादन खर्चात बचत करून शरयु साखर कारखाना उसाला उच्चांकी दर देत आहे ही समाधानाची बाब असून हा कारखाना आणि येथील व्यवस्थापन राज्यासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवारसाहेब यांनी व्यक्त केला.

कापशी (ता.फलटण) येथील शरयु साखर कारखान्याला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी शरयु उद्योगसमुहाचे अध्यक्ष श्रीनिवासबापू पवार, संचालक युगेंद्र पवार, कार्यकारी संचालक अमरसिंह पाटील, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, राजन फराटे यांच्यासह कारखान्याचे सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पवार यांनी कारखान्यातील प्रत्येक विभागाला भेट देवून तेथे वापरण्यात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तसेच त्यांनी प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शनही केले. अनेकदा साखर कारखान्यांना व्यवस्थापनासाठीच मोठा खर्च करावा लागतो. त्याचा फटका ऊसदरावर होत असतो. या पार्श्वभूमीवर शरयु कारखान्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून व्यवस्थापनातील खर्चात मोठी बचत केली आहे. त्याचा फायदा या कारखान्याला ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पवारसाहेब म्हणाले, साखर उद्योगात काटकसरीचे धोरण अवलंबले तरच ऊस उत्पादक सभासदाला समाधानी ठेवता येते. त्यामुळेच सातत्याने उच्चांकी दर देणारा शरयु कारखाना राज्यातील इतर कारखान्यांसाठी दिशादर्शक ठरेल.

चालू गळीत हंगामात शरयु साखर कारखाना ८ लाख टन उसाचे गाळप करणार असून यावर्षीही ऊस उत्पादकांना उच्चांकी दर देणार असल्याची माहिती यावेळी शरयु उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीनिवासबापू पवार यांनी दिली. पवारसाहेबांनी जवळपास तीन तास संपूर्ण कारखान्याची बारकाई पाहणी करत माळरानावर उभ्या केलेल्या या कारखान्याच्या कामकाजाबद्दल विशेष कौतुक केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''ओबीसींचा कट-ऑफ बघा अन् EWSचा बघा...'', धनंजय मुंडे मराठा आरक्षणावर बोलले

Viral Video : सचिन तेंडुलकरचं विमान वादळात अडकलं, हिंसक प्राणी असलेल्या जंगलात करावी लागली एमर्जन्सी लँडिंग

Income Tax Notice: खबरदार! मित्रांचं बिल भरण्यासाठी तुमचं क्रेडिट कार्ड वापरताय? तर आयकर विभाग कारवाई करणार

Uttrakhand : पंतप्रधान मोदीचा उत्तराखंड दौरा; आपत्तीग्रस्तांसाठी जाहीर केली १२०० कोटींची मदत

Asia Cup 2025: गौतम गंभीर आल्यापासून हे असंच होतंय... Arshdeep Singh वर होणाऱ्या अन्याविरोधात R Ashwin ने उठवला आवाज

SCROLL FOR NEXT