पश्चिम महाराष्ट्र

सातारा : ...त्यानंतर विकता येणार नाही मद्य

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता उर्वरित सर्व ठिकाणच्या परमिटरूममध्ये (एफएल-3) मद्याचा साठा शिल्लक असेपर्यंत किंवा लॉकडाउनचा कालावधी संपेपर्यंत सीलबंद बाटलीतून मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
 
यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमधील मद्य दुकाने सुरू राहणार नाहीत. परमिटरूम सुरू राहण्याच्या वेळा सकाळी 11 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवाव्यात. ही सवलत केवळ परमिटरूम (एफएल-3) मधील 19 मार्चअखेरीस असलेला मद्यसाठा संपेपर्यंत किंवा लाकडाउनचा कालावधी संपेपर्यंत यापैकी जे आधी होईल, तोपर्यंत लागू राहतील. त्यांनी त्यांचा शिल्लक मद्यसाठा सीलबंद बाटलीतून केवळ दारू पिण्याचा परवाना असलेल्यांनाच विक्री करता येईल. मद्यसाठा एमआरपी दराने विकणे बंधनकारक असेल. त्यावरील विक्रीकर रितसर भरावा लागणार आहे.

परमिटरूमच्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास देऊ नये, अन्यथा आदेशाचा भंग मानला जाईल. परमिटरूमधारकांना मद्यसाठा सीलबंद विक्रीसाठी परवानगी दिलेली असून त्यांना नव्याने मद्यसाठा हे आदेश लागू असेपर्यंत खरेदी करता येणार नाही.

कॉंग्रेस नेत्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिप विषयी सेनेचे मंत्री म्हणाले....

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज; वेळापत्रक जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT