Abhijit Bichukle
Abhijit Bichukle 
पश्चिम महाराष्ट्र

बिचुकले इथं 'बि'चुकले अन् लटकले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : धनादेश न वठल्याप्रकरणी येथील न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी खटल्यामध्ये हजर न राहिल्यामुळे निघालेल्या अजामीनपात्र वॉरंटमध्ये अभिजित बिचुकलेला गोरेगाव-मुंबईत टबिग बॉस' मालिकेसाठी तयार केलेल्या घरातूनच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर आज (शनिवार) न्यायालयात हजर केले. त्यांनी जामीनासाठी अर्ज केला असून, त्यावर युक्तीवाद सुरु आहे. 

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणारा अभिजित बिचुकले हा 'बिग बॉस' मालिकेतील सहभागाने राज्यात चांगलाच चर्चेत आला आहे. 'बिग बॉस'च्या घरातील त्याच्या करामतीमुळे त्याला या मालिकेतून काढण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली. या बिचुकलेला उचलण्यासाठी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक शुक्रवारी मुंबईकडे रवाना झाले होते. दुपारी त्यांनी "बिग बॉस'च्या घरातून त्याला ताब्यात घेऊन सायंकाळी साताऱ्यात आणण्यात आले. वैद्यकीय चाचणीनंतर त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. आज (ता. 22) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. 

अभिजित बिचुकलेने पैशाच्या चणचणीमुळे 2015 पूर्वी येथील ऍड. संदीप संकपाळ यांच्याकडून हातऊसने 28 हजार रुपये घेतले होते. ते पैसे त्यांनी वारंवार परत मागितले. त्यानंतर बिचुकलेने त्यांना 28 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश संकपाळ यांनी बॅंकत भरला; परंतु तो वठला नाही. त्यामुळे त्यांनी 2015 मध्ये बिचुकलेविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला होता; परंतु या खटल्यामध्ये बिचुकले हजर राहात नव्हता. तो सतत गैरहजर राहात असल्यामुळे न्यायालयाने दोन वर्षांपूर्वीच त्याला अजामीनपात्र वॉरंट काढले होते; परंतु दर वेळी तो सापडत नसल्याचा अहवाल पोलिसांकडून जात होता. दरम्यानच्या कालावधीत त्याने अनेक निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्जही दाखल केले होते. त्यामुळे खटला दाखल करणारे संकपाळही त्रासले होते. त्यानंतर न्यायालयाने पोलिस अधीक्षकांच्या नावेच बिचुकलेचा अजामीनपात्र वॉरंट बजावला. त्याचबरोबर "बिग बॉस'मध्ये खुलेआम वावरणारा बिचुकले पोलिसांना सापडत कसा नाही, असा प्रश्‍न संकपाळ यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर चक्रे वेगाने हलली. आता तो 'बिग बॉस'च्या घरात राहणार, की बाहेर पडणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SCROLL FOR NEXT