पश्चिम महाराष्ट्र

लई भारी : साताऱ्यातील पोलिसांनी त्याच्या मुसक्‍याच आवळल्या

सकाळ वृत्तसेवा

नागठाणे (जि. सातारा) : आष्टे (पुनर्वसन, ता. सातारा) येथील तेजस जाधव याच्या खून प्रकरणात संशयित साहिल शिकलगारने साताऱ्यातील कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. दरम्यान, या प्रकरणी गुरुवारी ता. 27 रात्री पोलिसांनी अमित राजेंद्र शेख ऊर्फ गायकवाड (वय 30, रा. झेडपी कॉलनी, शाहूपुरी, सातारा) याला अटक केली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सव्वादोन महिन्यांपूर्वी तेजस जाधवचे आष्टे गावातील मुख्य चौकातून अपहरण करण्यात आले होते. शुक्रवारी (ता. 21) त्याचा मृतदेह नागठाणे-सोनापूर मार्गालगत असलेल्या शिवारातील एका विहिरीत सिमेंटच्या पाइपला बांधून पाण्यात टाकलेला आढळून आला होता. 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा फोन मृत तेजस कुटुंबीयांना आल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला. या प्रकरणात बोरगाव पोलिसांनी तपास करत यापूर्वीच नागठाणे येथील सराईत गुंड साहिल रुस्तम शिकलगार, आशिष बन्सीराम साळुंखे, मोहन गजानन मोहिते (सर्व रा. नागठाणे, ता. सातारा) व शुभम संभाजी जाधव (रा. गडकर आळी, सातारा) या चौघांना अटक केली होती. सध्या हे चारही संशयित पोलिस कोठडीत आहेत. त्यातील साहिलने चौकशीदरम्यान साताऱ्यातील कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहाऱ्यावर असणाऱ्या पोलिसांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
दरम्यान, या खून प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एका संशयितास बोरगाव पोलिसांनी रात्री अटक केली. सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी संशयितांकडे कसून चौकशी केली. त्या वेळी खून व खंडणी प्रकरणामध्ये अमित शेख ऊर्फ गायकवाड याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बोरगाव पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतर अमितला दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांची संख्या पाच झाली आहे.

हेही वाचा : ...अन्‌ तेजसचे लष्कर भरतीचे स्वप्न हवेत विरले

वाचा : नराधमांनी माझ्या मुलाचा घात केला; न्याय मिळावा; आईची आर्त हाक

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT