पश्चिम महाराष्ट्र

कामगिरी फत्ते : घरापर्यंत काेट्यावधी रुपये पाेचले

सचिन देशमुख

कऱ्हाड ः लॉकडाउनच्या काळात पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवक संधी समजून सेवा करत आहेत. जनधन योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याणसह विविध योजना तसेच विविध बॅंकांमधील पैसे पोस्टामार्फत ग्राहकांना घरपोच दिले जात आहेत. महिनाभरात जिल्ह्यात सुमारे 11 हजार जणांना दोन कोटी नऊ लाख 25 हजार 220 रुपये पोस्टाने लोकांना घरपोच दिले आहेत. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सव्वा महिन्यापासून लॉकडाउन सुरू आहे. या काळात लोकांना घराबाहेर पडणेही मुश्‍किल झाले आहे. लोकांच्या घरातील धान्य, साहित्य संपल्याने दुकानातून खरेदी करायचे तर घरात पैसेही नाहीत, अशी अनेकांची स्थिती आहे. अनेकांच्या बॅंक खात्यात संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजनांसह निवृत्तीधारकांची पेन्शनची रक्कम बॅंकेत आहे. मात्र, बाहेर पडता येत नसल्याने त्यांची अडचण झाली होती. त्यासाठी पोस्ट खात्याने पुढाकार घेत लोकांना घरपोच पैसे देण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालयांतून लोकांना घरपोच पैसे देण्याची व्यवस्था केली आहे. पोस्टाने दिलेल्या क्रमांकावर लोकांनी त्याबाबतची माहिती दिल्यास ग्राहकांना घरबसल्या त्यांच्या बॅंक खात्यातील रक्कम दिली जात आहे. त्यासाठी संबंधित ग्राहकांचा बॅंक खात्याला आधार क्रमांक संलग्न असणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आजपर्यंत पोस्ट खात्याकडून मोठ्या प्रमाणात रकमेचे वाटप केले आहे. पोस्टमनसह ग्रामीण डाक सेवकांकडून लोकांना घरपोच पैसे दिले जात आहेत. आजअखेर जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार जणांना त्यांच्या बॅंकेतून पेन्शन तसेच अन्य योजनांचे एक कोटी 63 लाख 79 हजार 820 रुपये घरपोच केले आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील संजय गांधी योजना आणि श्रावण बाळ योजनेतील एक हजार 806 ग्राहकांना 45 लाख 45 हजार 400 रुपये घरपोच केले आहेत. पोस्टाच्या या सेवेमुळे लोकांत समाधानाचे वातावरण असून ऐन अडचणीच्या काळात मिळत असलेल्या सोयीबद्दल ग्राहकांतून समाधान व्यक्त होत आहे. 
 

कंटेनमेंट झोनमध्ये अडचण 

सातारा जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तेथे प्रशासनाने कंटेनमेंट झोन घोषित केले आहेत. त्यामुळे तेथे बॅंक, पोस्टासह सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे त्या परिसरात पोस्टालाही घरपोच रक्कम पोचवायला अडचण निर्माण होत आहे. अन्यथा आज दोन कोटींची असणारी रक्कम काही पटीने आणखी वाढली असती. मात्र,ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन नाही, त्या ठिकाणी घरपोच रक्कम देण्याचे काम सुरू आहे. 
 

कंटेनमेंट झोनमध्ये ग्राहकांना पैसे पोचवणे शक्‍य नाही. मात्र, उर्वरित ठिकाणी ग्राहकांना घरपोच रक्कम मिळत आहे. रकमेची कमतरता नसून बॅंकांना त्याबाबतच्या सूचनाही आहेत. त्यामुळे लोकांनी काळजी करू नये. या क्रमांकावर अधिक माहितीसाठी (02162 - 237443 & 237495) संपर्क साधावा

मोहन अहिरराव, प्रवर अधीक्षक, सातारा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

MNGL Fraud : एमएनजीएल गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने महिला वकिलाची ४.९८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Latest Marathi News Live Update : जोपर्यंत मी राहील तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील- वाजे

MNGL Fraud : एमएनजीएलच्या नावाने व्हॉट्सॲप एपीके फाईल; १३ रुपयांच्या बहाण्याने क्रेडिट कार्डवरून ३.६४ लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT