पश्चिम महाराष्ट्र

'त्या' महिला प्रांताधिकाऱ्यांचा दारूभट्टीवर छापा; दोघांची पळताभुई थाेडी

सकाळ वृत्तसेवा

म्हसवड (जि. सातारा)  : येथील माण नदी पात्रालगत भट्टीतून गावठी दारू काढण्याचे काम सुरू असताना प्रांताधिकारी अश्‍विनी जिरंगे यांनी छापा टाकला. या वेळी ट्रॅक्‍टरच्या टायरची दारूने भरलेली ट्यूब, एक कॅन दारू इलेक्‍ट्रिक मोटरपंप पत्र्याच्या तेलाचे पाच डबे, एक बॅरल, चार बाटल्या आढळून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावून हातभट्टी उद्‌ध्वस्त केली. संबंधितावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
प्रांताधिकारी जिरंगे म्हसवड शहरात लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर आल्या असता त्यांना गावठी हातभट्टी दारू काढण्यात येत असल्याची माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. त्या वेळी त्यांना तेथे दारू तयार करत असल्याचे निदर्शनास आले. दारू काढणारे दोघे जणांची पळताभुई थाेडी झाली मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरारी होण्यात यशस्वी झाले. 

दरम्यान जिरंगे यांनी पोलिसांना बोलावून हातभट्टी उद्‌ध्वस्त केली. संबंधितावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पाच जणांचे रिपाेर्ट निगेटिव्ह

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 5 कोरोना अनुमानितांचे रिपोर्ट बुधवारी (ता.15) निगेटिव्ह आले असून 9 नागरिकांना कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 4 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 3, कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे 2 नागरिकांना तीव्र जंतु संसर्गामुळे अशा एकूण 9 जणांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.

Lockdown : दारू दुकानमुक्त तालुक्यातच भट्ट्या फोफावल्या

Lockdown : मिलिटरी कॅंटीन पाच दिवस राहणार बंद; अत्यावश्‍यक सेवा वगळता उर्वरित सर्वांवर बंधने

लाकडे जमविण्यापासून ते सरण रचण्यापर्यंत प्रशासनाला कसरत करावी लागली. अंत्यसंस्कार गाडीसाठीही बराच वेळ खोळंबा झाला. सविस्तर वाचा या लढ्याविषयी 

झटपट पैसे कमवण्यासाठी युवकांच्या माध्यमातून दारुचा पूरवठा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon: माॅन्सूनची अजून पाच दिवसांची प्रतीक्षा! राज्यात ७२ टक्के कमी पावसाची नोंद, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस

आजचे राशिभविष्य - 16 जून 2026

Moong Dal Palak Idli Recipe: प्रोटीन आणि आयर्नचा भरपूर खजिना; नाश्त्यासाठी बनवा मऊ अन् स्पंजी 'मूग डाळ-पालक इडली'

16 जून 2026 पंचांग! चंद्रदर्शन, त्रिपुष्कर योग आणि शुभ मुहूर्तांची माहिती

अस्थिबोध : गरम पाण्याची पिशवी की बर्फ?

SCROLL FOR NEXT