पश्चिम महाराष्ट्र

खरंच... तांबवेकर लई भारी!

सकाळ वृत्तसेवा

तांबवे (जि. सातारा) ः तांबवेकरांनी साळखी तोडून कोरोनासारख्या आजाराला वेळीच रोखले. संकट काळात जीवावर उदार होत घरोघरी आशा स्वयंसेविका, अंगणवाडीताईंसह आरोग्य कर्मचारी व सुपने आरोग्य केंद्राच्या डॉक्‍टरांनी केलेल्या कामाला सलाम आहे. तांबवेकरांनी एकजुटीतून कोरोनाला हरवून खरचं तांबवेकर लईच भारी आहेत, हे सिद्ध करून दाखवले आहे, असे गौरवोद्‌गार प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी काढले.


कऱ्हाड तालुक्‍यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण तांबवेत सापडला. त्यामुळे गावासह प्रशासनही खडबडून गेले होते. त्यानंतर मात्र स्वयंस्फूर्तीने गावातील तरुणांसह ग्रामस्थांनी तपासणी करून घेतील. त्यामुळे गावातील साखळी गावातच रोखण्यात यश आले. या संकटाच्या दरम्यान आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याची मोठी जिम्मेदारी पार पाडली. त्यासाठी तब्बल 28 दिवस सुपने आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा हुंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तक, आरोग्य सेविका, कर्मचारी, पर्यवेक्षक यांनी सर्व्हे केला. त्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायतीने सत्कार झाला. त्याप्रसंगी प्रांताधिकारी बोलत होते.

तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक गणेश कड, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, माजी सरपंच आबासाहेब पाटील, उपसरपंच धनंजय ताटे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील, इंदुताई पाटील, आनंदराव ताटे, सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष धोंडीराम पवार उपस्थित होते. तहसीलदार श्री. वाकडे, श्री. धुमाळ यांचीही भाषणे झाली. उपसरपंच ताटे यांनी स्वागत केले.

जिल्हा परिषद सदस्य पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. गावातील दैनंदिन व्यवहार, दुकाने, बॅंका, पतसंस्था अनेक दिवस बंद होत्या. त्याही परिस्थितीत गावातून तहसील कार्यालयाला एकही तक्रार आली नाही. त्यांचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा, असे गौरवोद्‌गार अधिकाऱ्यांनी काढले. माजी सरपंच आबासाहेब पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT