पश्चिम महाराष्ट्र

एसपी तेजस्वी सातपुतेंचा मुस्लीम बांधवांना संदेश

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरु असलेल्या लॉकडावूनच्या परिस्थितीत ज्या प्रमाणे सामाजिक विलगीकरण पालन करण्याबाबतच्या राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहे त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्येही कटाक्षाने करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इप्तारसाठी एकत्र येवू नये. घराच्या, इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इप्तार करण्यात येवू नये, मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण अथवा इप्तार करण्यात येवू नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येवून करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.

सर्व मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह व इप्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पाडावे. लॉकडावून विषीय पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. 

क्षणात काॅन्स्टेबलच्या डोळ्यासमोरून स्वजीवनाचा फ्लॅशबॅक सरकला 
 

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते, असे म्हणतात. परंतु, एका यशस्वी पत्नीच्या मागेही एक खंबीर पुरुष महत्त्वाचा असतो, याची प्रचिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व त्यांचे पती किशोर या दांपत्याच्या जीवनातून येत आहे. कोरोनाच्या पातळीवर जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्याच्या लढाईत अग्रेसर राहून काम करणाऱ्या तेजस्वी यांना कुटुंबातील जबाबदारी पेलण्यात किशोर यांची मोलाची मदत होत आहे. त्यामुळेच हे दोघेही जिल्ह्यातील कोरोना फायटर्स ठरत आहेत. त्यांची कहाणी वाचाच - Video : CoronaFighter एसपींची मूलगी का रडली ?

ग्राहकांच्या साेयीसाठी आणि महावितरणला मदत हाेईल अशा प्रकारे एकमेकांना साह्य करण्याची आत्ताच वेळ आहे. 

रेशनिंगचा काळाबाजार वाढल्याची चर्चा ठिक ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रेशन दुकानदार यांच्यावर कारवाई देखील झाली आहे. रेशनिंग आणायला तुम्ही जाणार असाल तर त्यापुर्वी हे नक्की वाचा

Video : 'या' गावातील पाच हजार कुटुंबाची चिंता वाढली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT