पश्चिम महाराष्ट्र

तहसीलदार कार्यालयातील लिपिक ५० हजाराच्या लाचप्रकरणी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा तहसीलदार कार्यालयातील लिपिक रमाकांत अंकुश फडतरे याला 50 हजार रुपयांची ऑनलाइन लाच घेताना मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रमाकांत फडतरे याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्याच्या निवासस्थानीही पोलिस रात्री उशिरापर्यंत चौकशी करत असल्याची माहिती होती. 

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, की सातारा तहसीलदार कार्यालयात रमाकांत अंकुश फडतरे (रा. दौलतनगर, सातारा) हा लिपिक असून, त्याच्याकडे सातारा तालुक्‍यातील एका शेतकऱ्याचे जमीन पुनर्वसनाचे काम प्रलंबित होते. ते काम व्हावे, म्हणून तक्रारदार शेतकरी सातत्याने तहसील कार्यालयात हेलपाटे मारत होते. दरम्यान, हे काम करावयाचे असेल तर संबंधित तक्रारदार शेतकऱ्याकडे लिपिक रमाकांत फडतरे याने 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. 

त्या अनुषंगाने "एसीबी'कडे तक्रार दाखल झाल्यानंतर आवश्‍यक ती सत्यता पडताळण्यात येत होती. रात्री उशिरा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सापळाही रचण्यात आला. त्यावेळीच फडतरे लाच मागत असल्याचे समोर आले होते. दरम्यान, तक्रारदार शेतकरी येथे आल्यानंतर त्यांना फडतरे याने 50 हजार रुपयांची रक्कम बॅंक खात्यात भरण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने लाच म्हणून देण्यात येणारी 50 हजार रुपयांची रक्कम फडतरेच्या बॅंक खात्यात भरली होती. परिणामी लिपिक रमाकांत फडतरे हा लाच घेत असल्याचे स्पष्ट झाले होते. बॅंक खात्यात रक्कम जमा झाली असल्याची माहिती "एसीबी'च्या हातात येताच रमाकांत फडतरे यास तत्काळ अटक करण्यात आली. यानंतर त्याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 
"एसीबी'चे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलिस निरीक्षक अविनाश जगताप, प्रशांत ताटे, विशाल खरात, शीतल सपकाळ, नीलेश येवले कारवाईत सहभागी झाले होते.

ऐका : मी काय अशी तशी वाटले का ? दाेन लाख सत्तर हजारच पाहिजेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

Vaibhav Sooryavanshi : वैभवला पुन्हा संधी केव्हा मिळणार? गौतम गंभीरच्या उत्तराने सारेच गार; संजू सॅमसनचं नाव घेऊन विषयच संपवला

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Andheri Accident: अंधेरीत गोखले पुलावर दोन वाहनांची धडक, एकमेकांवर आदळल्यानं कारचा चुराडा; Video Viral

Asian Games, IND vs JPN : ३० चेंडूत पहिला विजय अन् भारतीय महिला संघाची पदकाच्या दिशेने कूच; यजमान जपानला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT