पश्चिम महाराष्ट्र

बोकड.....बिचारा जिवंत आहे की शिजतोय कोणास ठाऊक

दिलीपकुमार चिंचकर

सातार : तल्लफही वाईटच. तल्लफ ती मग कशाचीही असो. माणसाला तल्लफ कोठे नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही. बर कोणाली कशाची आसक्ती असेल, कोणाला कशाची तल्लफ होईल हे सांगता येणार नाही. ती कधी येईल हे ही कोणाला सांगता येत नाही. त्यात एखाद्या गोष्टीची जास्तच आसक्ती, इच्छा असेल तर मग बोलायलाच नको. तल्ल्फ भागविण्यासाठी एखाद्याचा जीव घ्यायलाही एखादा कमी करत नाही, याची कितीतरी उदाहऱणे घडली आहेत. तल्लफेसाठी चोऱ्या माऱ्या या शुल्लक आहेत. पण सध्याच्या संचारबंदीत त्याला उत आला आहे. अहो पालिकेच्या कस्टडीतून नुकतीच एका बदाद्दराने बोकड अन लहान शेळीची (पाट) चोरी केली आहे. पोलिस अन पालिका त्यांचा शोध घेत आहेत. बिचारे जीवंत आहेत की शिजत आहेत कोणास ठाऊक. 

संचारबंदीमुळे नागरीकांना अनेक इच्छा, आकांक्षा आणि आसक्तीला मुरड घालावी लागत आहे. पण सवय काही जात नाही. मुरडतरी किती घालायची. त्यामुळेच राज्यातील कोणत्याही शहरात पोलिसांच्या दंडुक्‍याची भिती असूनही नागरिक भाजी करीता गर्दी करताना आढळतात. विचारे सामान्य नागरीक भाजी मिळाली नाही तर डाळी खातील पण चोरी पर्यंत जाणार नाहीत. पण व्यसनी लोकांचे तसे नाही ती माणसे कोणत्याही थराला जात आहेत. संचारबंदीमुळे मद्य कोठेच मिळानासे झाले. पहिले आठ दिवस स्टॅक होता तो पर्यंत काही झाले नाही. मात्र नंतर गुपचूपही कोठेच मिळेना म्हटले की तळीरामांनी मद्याची दुकानेही फोडली. त्यातून उत्पादन शुल्क विभागाची गोदामेही सुटली नाहीत. या तळीरामांसारखी अवस्था पक्‍क्‍या खवैय्यांचीही झाली आहे. मटण विक्रीवर बंदी होती त्यामुळे पट्टीचे खवैय्ये अस्वस्थ झाले. तांबडा पांढरा रस्सा याचे नुसते नाव निघाले तरी त्यांच्या तोंडातून लाळ टपकू लागली. झणजणीत रस्सा, मसाल्यात शिजलेल्या नळ्या अनेकांच्या स्वप्नातही येवू लागल्या. त्यामुळे मटण कोठे मिळतेय का याच्या शोधात खवैय्ये असल्याचे सातत्याने आढळत होते. मग अनेक ठिकाणी बोकड चोरून कापले जाऊ लागले. त्यातही गमीत जमती घडल्या. मात्र आता काही जण चक्क चोरीवर उतरले आहेत. एका शेतकऱ्याच्या शेतातील छपरातून सात आठ बोकड शेळ्या चोरट्यांनी पळवून नेल्याची घटनाही नुकतीच घडून गेली. 

ते जाऊ द्या आता चोरट्यांनी पोलिस आणि पालिकेलाही सोडले नाही. त्याचे असे झाले. साताऱ्यात एके ठिकाणी चोरून बोकड कापला जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने जाऊन तेथे छापा टाकला. संबंधितावर कारवाई केली. तसेच तेथे आढळलेला एक बोकड अन पाट (लहान शेळी) जप्त केली. आणि ती घेऊन गेले पोलिस ठाण्यात. बर आता या बोकड आणि शेळीचे करायचे काय. ती कोणी सांभाळायची, त्यांना चारा कोण घालणार असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले. मग त्यांनी बोकड आणि शेळी दिली पालिकेच्या ताब्यात. पालिकेने बोकड आणि शेळीला कोंडवाड्यात ठेवले. कोंडवाड्यातील जनावरांची काळजी घ्यायाल एक पालिकेचा कर्मचारी असतो. बिचारा असल्या संचारबंदीत, कोरोना विषाणूच्या भितीत रात्रंदिवस त्या शेळी आणि बोकडाची काळजी घेत राहिला. 

पण चोरट्यांनी आपेल कसब दाखविले. कोंडवाड्यावरील पालिकेच्या कर्मचाऱ्याला गुगारा  देऊनचोरड्यांनी बोकड अन शेळी पळविली. ताब्यातील जनावरांची चटोरी होताच बिचाऱ्या कर्मचाऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले. पालिकेने पोलिस ठाण्यात धाव घेतली अन बोकड - शेळीच्या चोरीची फिर्याद नोंदविली. सध्या पोलिस आणि पालिकेचा संबंधित कर्मचारीही बोडकडाच्या अन शेळीच्या शोधात पिरत आहेत. बिचारे बोकड जिवंत आहे की शिजत आहे कोणास ठाऊक. 

हेही वाचा आणि पहा :  इश्‍काचा गुलकंद 

खाल्ले तर सारेजण खाऊ...नाहीतर सगळेच उपाशी मरु 

बिलीमाेरीया हायस्कूलला माेठी आग; पाचगणी,महाबळेश्वर, वाईतील अग्नीशमक दल दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT