सातारा - बस स्थानक ते तहसील कार्यालयासमोर चारचाकी लावल्याने अशी वाहतूक कोंडी होत असते.
सातारा - बस स्थानक ते तहसील कार्यालयासमोर चारचाकी लावल्याने अशी वाहतूक कोंडी होत असते. 
पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात वाहतुकीचा बेशिस्तपणा

सकाळ वृत्तसेवा

सातारा - येथील पोवई नाक्‍यावर ग्रेडसेपरेटरचे काम सुरू असल्याने वाहतुकीची मोठी समस्या उभी राहिली आहे. अशातच वाहनधारकांचा बेशिस्तपणा वाढल्याने वाहतूक कोंडीला आयते निमंत्रण मिळत आहे. तहसील कार्यालय व आयडीबीआय बॅंकेसमोर कोठेही चारचाकी, दुचाकी वाहने लावली जातात.

परिणामी, वाहनचालक, पादचाऱ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
सातारा शहरातील आठ रस्ते एकत्र आलेल्या पोवई नाक्‍यावर गत वर्षभरापासून ग्रेड सेपरटरेच काम सुरू आहे. सध्या कोरेगाव, कऱ्हाड, बस स्थानक, राजपथ मार्गावर खोदाई करून बोगदे तयार केले जात आहेत. हे काम पुढील मार्चपर्यंत चालण्याची शक्‍यता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वर्तविली जात आहे.

यामुळे या रस्त्यांवरील वाहतूक लगतच्या पर्यायी रस्त्यांवरून सुरू केली आहे. नाक्‍यावरील बोगदा रस्त्यांची कामे मार्गी लागली असल्याने ती बुजवून त्यावरून वाहतूक सुरू केली आहे. यामुळे थोड्याफार प्रमाणात वाहतूक दिलासादायक ठरली आहे. मात्र, अनेक चारचाकी, दुचाकी वाहनचालक आयडीबीआय बॅंक व तहसील कार्यालयासमोर बेशिस्तपणे पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. तहसील कार्यालयासमोर जागा मिळेल तेथे चारचाकी वाहने लावून जात असतात. बिनधास्तपणे वाहने उभी करून खरेदीसाठी बाहेर जात असतात. सध्या शाळा सुरू असल्याने मरिआई कॉम्प्लेक्‍ससमोरील रस्त्यावरील, तसेच दाखले काढण्यासाठी तहसील, प्रांताधिकारी कार्यालयांत वर्दळ वाढली असल्यामुळे या रस्त्यांवरील ताण वाढला आहे. शिवाय, तहसील कार्यालय ते पोवई नाका येथून चारचाकी वाहनांसाठी येण्या- जाण्यास बंदी असताना काही चारचाकी चालक त्यातून वाहने पुढे आणत आहेत. त्यामुळे तेथेही गर्दी होत असते.

पोवई नाक्‍यावर रस्त्याच्या मध्यभागी वाहने उभी केल्याने वाहतूक समस्या उद्‌भवत आहे. तशी वाहने आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करू.
- सुरेश घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सातारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT