पश्चिम महाराष्ट्र

Video : 'या' गावातील पाच हजार कुटुंबाची चिंता वाढली

सचिन शिंदे

कऱ्हाड ः सोन्याचे दर आभाळाची उंची गाठत आहेत. मात्र, त्याच सोन्याला आकार देणाऱ्या, त्याची नक्षीकाम करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे पाच हजार पश्‍चिम बंगालच्या कारागिरांसह कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. बचत करण्याची अजिबात सवय नसणाऱ्या कुटुंबांना पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात सोनार व्यावसायिकांनी मदतही केली. मात्र, व्यवसायच ठप्प असल्याने आता त्यांच्याकडूनही मिळणाऱ्या मदतीला मर्यादा आल्या आहेत. 

तीन ते चार दिवसांपूर्वी 40 हजारांच्या आसपास असणाऱ्या सोन्याच्या दराने अचानक 45 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सोने दरावर लॉकडाउनचा परिणाम सकारात्मक झाल्याचे जाणकारांचे मत आहे. मात्र, त्याच सोन्याला आकार देणाऱ्या कारागिरांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात पाच हजार कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. लॉकडाउन आहे, हाताला काम नाही. त्यामुळे आता करायचे काय, असा प्रश्न त्या कारागिरांना सतावतो आहे. एका कुटुंबात किमान सरासरी पाच सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची संख्या 25 हजारांच्या आसपास जाते. बऱ्यापैकी कारागीर आपल्या कुटुंब कबिल्यासह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक आहेत. सोन्याचे नक्षीकाम करणे वगळता अन्य कोणताही दुसरा व्यवसाय नाही. त्यामुळे लॉकडाउनच्या काळामध्ये सध्या त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त कोरडा गेला.


अक्षयतृतीयेच्या (ता.26 एप्रिल) मुहूर्तावर कोरोनाचे संकट आहे. कारागिरांसाठी या दोन्ही सणाला मोठी संधी असते. तेच सण कोरडे जात असल्याने त्यांच्यापुढे करायचे काय, हाच खरा प्रश्न आहे. नक्षी कारागिरांसह सोने आटणीवालेही अडचणीत आहेत. त्यांच्याही हाताला काम नाही. त्यांचाही व्यवसाय पूर्णपणे घटला आहे. त्यावरही शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. 

विलगीकरण कक्षातील डॉक्‍टर, नर्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

Video : देवा सारखी माणसे मला भेटली

खाल्ले तर सारेजण खाऊ...नाहीतर सगळेच उपाशी मरु 

ब्रेकिंग : सातारा जिल्ह्यात दाेन युवकांना कोरोनाची लागण 

 


""बचत केलेल्या पैसा संपला, मालकाकडून उधार मागितले तरी पैसे मिळत नाहीत. एक दिवस कमी जेवतो. काही वेळा जेवत नाही. अशी स्थिती आमच्यावर आली आहे. मालकांनाही मदत करण्याच्या मर्यादा आहेत. सरकारने आमची व्यवस्था येथेच करावी, अथवा सरकारने गावी पाठविण्याची व्यवस्था करावी.'' 
शफीक शेख, सोने नक्षी कारागीर, पश्‍चिम बंगाल, कऱ्हाड 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT