MLA Satej Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

राज्यातील 20 ते 22 आमदारांसोबत स्वत: बोललोय, ते कोठेही जाणार नाहीत; सतेज पाटलांनी दिली महत्त्वाची अपडेट

महाराष्ट्रात झालेल्या विविध सर्व्हेमधून लोकसभेत महाविकास आघाडीला २५ ते २६ जागा मिळतील, असे वातावरण आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील सर्व आमदारांशी चर्चा करण्याची जबबादारी आपल्यावर सोपवली आहे. त्यानुसार त्यांच्यासोबत चर्चा करुन सर्वांची मते जाणून घेतली आहेत.

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) गट भाजपसोबत गेल्यानंतर मंत्री पद कोणाला मिळाले हे जग जाहीर आहे. इतर मंत्री मंडळाचा विस्तार झाला नसल्याने भाजपमधील अंतर्गत खदखद वाढणार आहे. महाराष्ट्र आणि देशात काँग्रेचा झेंडा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आम्हा सर्व तरुण पिढीवर आहे. काँग्रेसची ही लढाई निश्‍चितपणे जिवंत ठेवणार असल्याचे मत आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी व्यक्त केले.

अजिंक्यतारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसमधील (Congress) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत राज्यातील काही आमदारही जाणार आहे, अशी चर्चा दिवसभर सुरु होती. मात्र, पक्षातर्फे पाटील यांनी या चर्चेला पूर्णविराम देत काँग्रेसच्या ध्येय धोरणांची माहिती दिली.

आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्रात झालेल्या विविध सर्व्हेमधून लोकसभेत महाविकास आघाडीला २५ ते २६ जागा मिळतील, असे वातावरण आहे. राज्यातील वीस ते बावीस आमदारांसोबत स्वत: बोललो आहे. ते कोठेही जाणार नाहीत. याशिवाय पक्षाचे इतर नेतेही बोलत आहेत. हे सर्व आमदार काँग्रेससोबतच आहेत. त्यामुळे आणखी कोणी जातील असे वाटत नाही. राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील सर्व आमदारांशी चर्चा करण्याची जबबादारी आपल्यावर सोपवली आहे. त्यानूसार आज दिवसभर त्यांच्यासोबत चर्चा करुन सर्वांची मते जाणून घेतली आहेत.’

लोकसभेचा मूड वेगळा, महाराष्ट्रातील वेगळा

महायुतीचा कारभार लोकांना मान्य नाही. लोकसभेचा मूड वेगळा दिसतो, महाराष्ट्रातील मूड वेगळा दिसतो. त्यामुळेच आम्ही एकत्र असणे काळाजी गरज असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

Pune Nashik Highway Accident: पुणे-नाशिक मार्गावर कंटेनर-ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, एकलहरे येथे वाहतूक कोंडी!

SCROLL FOR NEXT