Sathya Kaal and Bapat Bal Shikshan Mandir ... 
पश्चिम महाराष्ट्र

साथीचा काळ आणि बापट बाल शिक्षण मंदिर...

विजय बक्षी

सांगली : सध्या कोविड आपत्तीकाळात अनेक शाळा-महाविद्यालये मंगल कार्यालयांच्या इमारतींचा वापर होत आहे. आरोग्य जनजागृतीसाठी व्यापक उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र याआधी प्लेग,फ्लू आणि टायफॉईडच्या साथीतही असाच काही माहौल होता. सांगलीतील बापट बाल शिक्षण मंदिरची इमारतीत रुग्णालय सुरु झाले होते. 

राजवैद्य आबासाहेब सांभारे यांची सांगलीसह सर्वत्र ख्याती होती. सध्या सांभारे गणपतीमुळे त्यांची आठवण सांगलीकरांना राहिली आहे. त्यांचा कालखंड 1868 ते 1933. लोकमान्य टिळकांनाही त्यांनी मधुमेहाचे उपचार दिले होते. 1932-33 च्या प्लेग साथीत लोकांवर उपचार करतानाच त्यांना प्लेगची बाधा झाली. त्यात त्यांचे निधन झाले. त्याकाळात 1934 मध्ये खणभागात मोठ्या प्रमाणात आरोग्य सप्ताह साजरा झाला होता. प्रभात फेरी, आरोग्यविषयक प्रदर्शन, व्यायाम, चित्रपट, आरोग्य पत्रकांचे वाटप असे कार्यक्रम झाले होते. आजच्या सारखी तेव्हाही स्वच्छता मोहिम झाली. दलदलीच्या जागा भरणे, पडीक जागांची सामुहिक स्वच्छता असे उपक्रम झाल्याच्या नोंदी आहेत. 

1957-58 मध्ये दोन साथी आल्या. पहिली फ्लूची होती. या साथीचाही वैद्यक क्षेत्राला मोठा ताण आला होता. सांगलीतील सर्व वैद्यक तज्ज्ञांनी साथकाळात सेवा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कार्यशाळा घेतली होती. त्यात चारशेंवर तरुण स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. दुसरी साथ कॉलऱ्याची आली होती. यासाठी तत्कालीन नगरपालिकेने बापट बाल शिक्षण मंदिरात तात्पुरता दवाखाना उभा केला होता. 

1975-76 मध्ये सांगलीत टॉयफाईडची साथ आली होती. त्यावेळी पुन्हा बापट बालमध्ये दवाखाना थाटला होता. त्यावेळी सरकारी दवाखान्यात इतके रुग्ण झाले की सरकारी दवाखान्याला लोक टायफाईडचा दवाखाना म्हणून लागले. पुढे तापाचा दवाखाना अशीच त्याची ओळख झाली. 

सध्या जसे मिरज सिव्हिलला कोविड रुग्णालय म्हणतात तसेच. 1931 मध्ये स्थापन झालेल्या बापट बालच्या स्थापनेमागे सांगली एज्युकेशन सोसायटीच्या संस्थाचालकांना एक आदर्श अशी प्राथमिक शाळा सुरु करण्याचा मानस होता. तीन मुलांच्या नोंदणीवर सुरु झालेल्या या शाळेत शेकडो सांगलीकरांनी प्राथमिक धडे गिरवले. आता बापट बालला 89 वर्षे झाली. दवाखाना म्हणूनही "बापट बाल'ने कधी काळी सांगलीकरांची सेवा केली आहे. सध्याच्या साथकाळात त्यांच्या स्मृती जाग्या झाल्या. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal No 1 : नव्या वर्षात डिजिटल पत्रकारितेचा नेतृत्वाचा मुकुट पुन्हा ई-सकाळकडे, कॉमस्कोअरमध्ये पटकावले अव्वल स्थान

Retirement Plan : आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता नाही! या 5 योजनांत गुंतवणूक करा; तिजोरी भरलेलीच राहील, दरमहा मिळेल मोठी पेन्शन

Tilak Varma Injury: तिलक वर्माला पोटातील तीव्र वेदनेमुळे अचानक करावी लागली सर्जरी! त्याला झालेला अजार नेमका आहे तरी काय?

Mangal Gochar 2026: 18 वर्षांनंतर कुंभ राशीत मंगल गोचर! अग्नि-वायु एकत्र येऊन तयार होतोय अंगारक योग, वृषभसह 'या' 5 राशींच आयुष्य होईल अगदी कठीण!

Latest Maharashtra News Updates Live: आष्टापुरात बिबट्याने तीन बकऱ्यांचा घेतला जीव

SCROLL FOR NEXT