पश्चिम महाराष्ट्र

... तर सदाभाऊ सन्मानाने ‘स्वाभिमानी’त - सावकर मादनाईक

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - मंत्री सदाभाऊ खोत यांनी जाहीर केल्याप्रमाणे उसाला पहिली उचल विनाकपात तीन हजार ५७५ रुपये देण्यास कारखानदारांना भाग पाडल्यास राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सन्मानाने परत घेऊ, असा टोला ‘स्वाभिमानी’चे नेते सावकर मादनाईक यांनी लगावला. 

राज्यमंत्री खोत यांनी कसबे डिग्रज येथील सभेत उसाला पहिली उचल सरासरी तीन हजार ५७५ रुपये मिळणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, काही साखर कारखान्यांनीही तशी तयारी दाखविली असल्याचे खोत यांनी म्हटले आहे. 

यावर बोलताना श्री. मादनाईक म्हणाले, की शेतकऱ्यांना ऊसदर मिळावा, यासाठी आम्हाला प्रत्येक वर्षी संघर्ष करावा लागतो. गतवर्षी राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. जवळपास ४६५ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. राज्य सरकारकडून त्यांच्यावर कारवाईचे केवळ कागदी घोडे नाचविले गेले.’’ 

आम्ही आंदोलन करणार नाही
राज्यमंत्री खोत यांनी उसाला पहिली उचल जेवढी जाहीर केली आहे, तेवढी उचल साखर कारखान्यांना देण्यास भाग पाडावे. असे झाल्यास आम्ही आंदोलन करणार नसल्याची ग्वाही मादनाईक यांनी दिली. संघर्षाशिवाय उसाला दर मिळत असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू. पहिली उचल  विनाकपात तीन हजार ५७५ रुपये दिल्यास सदाभाऊंचा त्याच ऊस परिषदेच्या मैदानात सत्कार परिषद घेऊन पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सन्मानाने प्रवेश देऊ, अशी घोषणा मादनाईक यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT